कर्जत रिपाइं (आठवले) पक्षातुन मनोज गायकवाड यांची केली हकालपट्टी!

रिपाइंचा विशेष सभेत ठराव मंजुर!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत रिपाइंचा झंजावात वाढत असतानाच रिपाइंचे कर्जत तालुक्यांतील कार्यकर्ते मनोज गायकवाड हे पक्षविरोधी भुमिका वारंवार घेत असल्याने रिपाइंचे कार्यकर्ते संतप्त झाले होते, अखेर आज रिपाइंची विशेष सभा कर्जत येथे पार पडली, त्यामधे मनोज गायकवाड यांची पक्षातुन हकालपट्टी करणेचा ठराव एकमतान मंजुर करण्यात आला असुन मनोज गायकवाड यांची रिपाइं (आठवले) पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली असल्साची माहीती कर्जत तालुका रिपाइंचे अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी पत्रकार परीषदेत दिली आहे. कर्जत तालुका रिपाइंचा वतीने आज पत्रकार परीषद घेणेत आली आहे. यावेळी या पत्रकार परीषदेत कर्जत रिपाइ कार्यकारणीने मनोज गायकवाड यांचा पक्षविरोधी क्रुत्याचा पाढाच वाचला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा “संघर्ष नायक” पुस्तक प्रकाशन तसेच शासकीय योजनांची माहीती कार्यक्रमास मुंबई येथे कार्यकर्त्यांनी येणेचे आवाहन पक्षीय नेते कोकणचे अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड, जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाइ गायकवाड यांनी केले होते, मात्र त्याच दिवशी कार्यकर्त्यांनी कर्जत कचेरीत मोठ्या संख्येंने जमायचे आवाहन मनोज गायकवाड याने केले होते, त्यामुळे पक्षीय कार्यकर्त्यांमधे संभ्रम निर्माण करणेचे काम मनोज गायकवाड यांनी केले होते, पक्षीय नेते आठवले यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन सोहळ्यास रिपाइ कार्यकर्त्यांना जाता येवु नये असा उद्देश मनोज गायकवाड याचा असल्याचेही तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. 

 विशेष म्हणजे नुकताच रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा विरोधात व्हाटसापवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरस करणारे विरोधात कर्जत रिपाइंने नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, त्याप्रकरणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास मनोज गायकवाड यांनी बळ दिल्याचा ओरोपही तालुकाअध्यक्ष हीरामण गायकवाड यांनी पत्रकार परीषदेत घेतला आहे, त्यामुळे मनोज गायकवाड हे आठवले  रिपाइं पक्षाचा विरोधात भुमीका वारंवार घेत असल्याने पक्षाचे नुकसान होत असल्यानेच आज त्यांची हकालपट्टी पक्षातुन करण्यात आल्याचे रिपाइ पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे पत्रकार परीषदेत पत्रकारांना सांगितले आहे. 

 दरम्यान रिपाइंचा कार्यक्रमांसदर्भात रिपाइंचा कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी काोणतीही पक्षवाढीसाठी काहीही पोस्ट मनोज गायकवाड ॲडमिन असलेल्या “व्हाटसाप” ग्रुपवर पोस्ट केल्यास त्या ग्रुपवरुन मनोज गायकवाड रिपाइंचा पदाधिकाऱ्यांना रिमुव्ह करीत असतात, आता पर्यंत मनोज गायकवाड याने कर्जत महिला शहर अध्यक्ष तसेच तालुका सहसचिवसह यांसह अनेक पदाधिकाऱ्यांना “त्या” व्हाटसाप ग्रुपवरुन रिमुव्ह केल्याने रिपाइं पदाधिकाऱ्यांमधे असंतोष पसरला आहे, त्यामुळेच पक्षविरोधी भुमिका घेणाऱ्या मनोज गायकवाड याच्यावर रिपाइं (आठवले) पक्षवाढीसाठी हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याचेही तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी शेवटी पत्रकार परीषदेत सांगितले आहे, त्यामुळे यापुढे मनोज गायकवाड यांचा रिपाइं (आठवले) पक्षाशी काही संबध नसल्याचेही तालुका रिपाइं कमिटीचा वतीने पत्रकारांना सांगणेत आले आहे.

संबंधित पोस्ट