
इनरव्हील क्लबच्यावतीने रक्तदान शिबिर;25 रक्तदात्यांनी केले रक्तदान!
- by Reporter
- Oct 24, 2022
- 311 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड);- रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील इनरव्हील क्लबच्यावतीने नुकताच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कर्जतमधील शनी मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले,इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा उत्तरा वैद्य यांनी उपस्थितांचे स्वागत केले,मालिनी नागडा (शहा) यांनी सर्व प्रथम रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला.रक्त संकलनाचे काम संकल्प ब्लड बँक कल्याणच्या डॉ.सोनाली देसाई, राजशेखर नायर, कीर्ती सिंग, समृद्धी देसाई, पार्वती गायकवाड यांनी केले, त्यांना सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी करुणा पराडकर, वनिता सोनी, मोनिका बडेकर, ज्योत्स्ना शिंदे, प्राची चौडीए, अवंतिका गायकर, तन्वी जोशी, मधुरा मुळे, पल्लवी सावंत,शीला गुप्ता, संजीवनी घुमरे, साक्षी अडसुळे, सरस्वती चौधरी, शितल पाटील, रूपा खन्नाल, वैशाली दांडेकर, आशा ठोंबरे उपस्थित होत्या.
रिपोर्टर