कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत "स्वामी"ची दिवाळी

मुंबई  : 'स्वामी' ही संस्था समाजातील गरीब गरजू लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते . त्यापैकी एक उपक्रम म्हणजे "कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत दिवाळीची एक आनंदी संध्याकाळ आणि फराळ वाटप". दरवर्षी प्रमाणे याही वर्षी के. भावसार सभागृह, परेल, मुंबई येथे . मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह परगावाहून आलेल्या ३५० कॅन्सरग्रसरुण आणि त्यांचे नातेवाईकांना दिवाळी फराळासोबत बॅग, साडी, टॉवेल, साबण, तेल व पावडर इत्यादींचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी भोईवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र पवार, फेस कॉम ज्येष्ठ नागरिक संघाचे मुंबई अध्यक्ष शरद डिचोलकर आणि समाजसेवक तसेच श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास माजी विश्वस्त नितीन कदम व देणगीदार तसेच स्वामीचे अध्यक्ष सुरेश लाड, कार्याध्यक्ष मोहन कटारे, ऑडिटर श्रीकांत कुलकर्णी, श्रीनिवास जोशी अंतर्गत हिशेब तपासनीस उपस्थित होते.

त्या प्रसंगी कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनोरंजनासाठी स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्राचा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे संयोजन विमल माळोदे यांनी केले तर सुसंगत सूत्रसंचालन अनिल तावडे यांनी केले. तालबद्ध वाद्यवृंदाची जबाबदारी हार्मोनियमवर दत्ताराम घाडी, नंदकुमार आरोंदेकर, राजरत्न कदम, ढोलकीपटू दिलीप मेस्त्री,  तालवाद्य शिवाजी गावकर, व्हायोलिन मंगेश तळगावकर यांनी संभाळली. 

तर उपस्थितांना शुभदा मोरे, शैलजा काळे, सुनिता पारकर, वंदना भाटवडेकर, राजरत्न कदम, अर्चना ठाकूर, अशोक अंबुर्ले, दशरथ खमितकर, गणेश करलकर, कांतीलाल परमार यांनी आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले.

सभागृहात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी मनमोहक रांगोळी रश्मी नाईक, सिद्दी परब, ममता खेडेकर आणि साध्वी डोके यांनी साकारली होती. 

मुख्य कार्यक्रमाचे समयसूचक सूत्रसंचालन सुरेंद्र व्हटकर आणि साध्वी डोके यांनी केले. तर आभारप्रदर्शन सुरेश लाड यांनी केले. 

उपक्रम प्रमुख वैशाली ढोलम आणि ममता खेडेकर, रुग्णांची नावनोंदणी करण्यासाठी सुमंगल गुरव, वैशाली शिंदे, विमल माळोदे, रश्मी नाईक, सिद्धि परब तत्पर होत्या. कार्यक्रमाची व्यवस्था रचना खुळे, प्रदीप ढगे, उल्हास हरमळकर, किरण करलकर, प्रतिभा सावंत, पुजा करलकर, संतोष कुलकर्णी, सुरेंद्र व्हटकर, साध्वी डोके, गोविंद राणे, नितीन तांबे, मनियार, गीता नाडकर्णी, तोंडवलेकर, प्रतिभा सपकाळे, प्रियांका गायकर, लखबीर कौर, सुरिंदर कौर, नम्रता व्हटकर, सुरेखा निमकर, उर्मिला जाधव, निलेश पाठारे यांनी चोख सांभाळली.

संबंधित पोस्ट