नेरळ फेसबुक प्रकरणातील आरोपीची दिवाली न्यायलयीन कोठडीत! समाजाचा वकीलांची सरशी! पोलिस तपासावर जनता खुश!
- by Adarsh Maharashtra
- Oct 19, 2022
- 411 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाणेत डॅा. बाबासाहेब आंबेडकर तसेच भारतीय संविधानाचा विरोधात फेसबुक अकांऊटवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी या घटनेतील आरोपीस अटक केली, मात्र सदर आरोपी १ महीन्यापासुन कोठडीत असतानाच आज पुन्हा न्यायालयाने ९ तारखेपर्यंत आरोपींचा न्यायलयीन कोठडीत वाढ केल्याने सदर आरोपीची दिवालीही आता न्यायलयीन कोठडीतच होणार आहे,
दरम्यान नेरळ फेसबुक प्रकरणाचा तपास पोलिसांनी पारदर्शक केल्याने समस्त बहुजन जनतेतुन पोलिस तपासाबाबत समाधान व्यक्त होत आहे. पनवेल येथिल न्यायलयात आज सदर फेसबुक प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्जावर मा. सत्र न्यायालय पनवेल येथे सुनावणी होणार होती, मात्र सदर फेसबुक प्रकरणातील आरोपीला जामीन होवु नये याकरता बहुजन चळवळीतील वकील मंडळीनी प्रयत्न केले. न्यायदेवतेने पु्ढील तारीख दिल्याने आता नेरळ फेसबुक प्रकरणातील आरोपीची दिवाली न्यायलयीन कोठडीतच होणार आहे. यावेळि रायगड भुषण व फिर्यादी किशोर गायकवाड यासंह संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, रिपाइचे तालुकाअध्यक्ष हीरामण गायकवाड, जिवक गायकवाड, संदिप गायकवाड, संतोष जाधव इत्यादी उपस्थित होते.
कर्जत तालुक्यांतील नेरळ येथिल आशा राणे यांच्या नावे असणाऱ्या फेसबुकवरुन विघ्नेश अरविंद नाईक याने डॅा. बाबासाहेब आंबेडकर, तसेच संविधान विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती, त्यावेळी कर्जतचे रिपाइचे पदाधिकारी रायगड भुषण किशोर गायकवाड यांनी या बाबतची तक्रार दिली होती, त्यानुसार नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २२८/२०२२ नुसार कलम १५३-अ, २९५-अ, अ.जा.ज.अ. ५ कायद्याचे कलम ३(१) (u) अन्वये गुन्हा २० जून रोजी दाखल करणेत आला होता. त्यावेळी पोलिसांनी या घटनेचा तपास करुन आरोपीस २० सप्टेंबर रोजी अटक केली आहे.
आज पनवेल न्यायलयात जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होती, त्याचवेळी या घटनेतील फिर्यादी रायगड भुषण किशोर गायकवाड यासंह समाजातील विधीतज्ञ ॲड. नवनीत साळवी, ॲड. महेंद्र भिंगारदिवे, ॲड. उत्तम गायकवाड, ॲड. भाऊसाहेब मोरे हे न्यायलयात हजर झाले व फिर्यादीचा वतीने वकिलपत्र दाखल करुन न्यायलयाला सदर आरोपीस जामीन होवु नये याकरता विनंती केली, त्यामुळे पुढील तारीख देणेत आल्याने आरोपीची दिवाली न्यायलयात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे समस्त बहुजन जनतेत समाधान पसरले आसुन पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासाचेही कौतुक होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम