ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी ठरली सरस : भाजपची मोठी पीछेहाट

भिवंडी : नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी सरस ठरली असून भाजपची व शिंदे गटाची चांगलीच पीछेहाट झाल्याचे चित्र दिसत आहे.ठाणे जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला असून भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 75 ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध करून भाजपला चांगलीच धूर चारली आहे.शिंदे गटाने मात्र आपली नामुष्की झाकण्यासाठी सरपंच पळवापळवीचे धोरण आखले असले तरी म्हाविकास आघाडी अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहापूर मध्ये ठाकरे गटाने सर्वाधिक म्हणजे 30 जागा जिंकत आपणच नंबर वन असल्याचे सिद्ध केले असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही 14 ग्रामपंचायत जिंकल्या असून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी कार्यकर्त्यांना बळ पुरविल्याने काँग्रेसने प्रथमच सात ग्रामपंचायत जिंकल्याचा दावा केला आहे.त्यामुळे म्हाविकास आघाडीचे संख्याबळ 51 झाले असून भाजपने मात्र केवळ 7 जागा जिंकल्या आहेत.

भिवंडी मध्ये भाजप आणि शिंदे गटाचे पानिपत झाले असून शिंदे गटाला 1 तर भाजपला अवघ्या 7 ग्रामपंचायत मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीने 20 ग्रामपंचायत जिंकल्या आहेत.कल्याण मध्ये 7 ग्रामपंचायत महाविकास आघाडीने घेतल्या असून इथेही भाजप पिछाडीवर आहे.नाही म्हणायला मुरबाड मध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असली तरी ते आमदार किसन कथोरे यांना मानणारा मोठा गट असल्याने व कथोरे समर्थक  निवडून आले आहेत.शिवसेना फोडण्यासाठी केलेली खेळी,थेट सरपंच निवडणूक प्रक्रिया आणि राज्यात झालेला सत्ताबद्दल या जमेच्या बाजू असल्याने आपलाच पक्ष ग्रामपंचायत मध्ये सरस ठरेल असे वाटणाऱ्या भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे.

शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे,काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे,राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचा महाविकास आघाडी म्हणून चांगला समन्वय होत असल्याने तिन्ही पक्षात तेढ निर्माण न होता एकत्रित निवडणुका लढल्याने महाविकास आघाडी सरस ठरली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी शहरात काँग्रेसची ताकद असली तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या काँग्रेस पक्षाला दयानंद चोरघे यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व मिळाल्याने काँग्रेसचे संघटन वाढले असून यावेळी दयानंद चोरघे यांनी ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्याने प्रथमच काँग्रेसने भिवंडी, शहापूर तालुक्यात ग्रामपंचायत जिंकल्या आहेत.राज्यात सत्तांतर झाल्याचा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये भाजपला फायदा झाल्याचे दिसत नसून म्हाविकास आघाडी मात्र अधिक भक्कम झाल्याचेच चित्र दिसत असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकित भाजप व शिंदे गटासाठी ही धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल.

संबंधित पोस्ट