वरळी येथे जिजाऊ महिला ग्राहक पेठेचे आयोजन संपन्न,भा.ज.पा. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते उद्धाटन
- by Reporter
- Oct 18, 2022
- 320 views
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासुन अर्जुन दत्ताजी मेघे यांच्या संकल्पनेतुन इन्सानियत असोसिएशन मुंबई सह महाराष्ट्रात कार्यरत आहे
कोरोनाच्या संकट काळात या असोसिएशनने अनेक सामाजिक उपक्रम राबिवले मुंबईतील विविध ठिकाणी नागरीकांना अन्न धान्याचे किट वाटप केले , रक्तदान शिबीर , आरोग्य शिबीर , गरजू व गरीब नागरीकांना रेडी टू इट अन्नदान वाटप केले होते
यावेळी इन्सानियत असोसिएशनने वरळी मधील महिलांच्या घरगुती वस्तु , पदार्थांचे प्रदर्शन तसेच यामुळे महिला बचत गटांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ महिला ग्राहक पेठ यांचे उद्धाटन भा.ज.पा. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार , युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष ताजेंदर सिंह तिवाना , दक्षिण मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष सनी सानप व प्रोटोकाॅल सचिव संतोष पांडे यांची उपस्थिती लाभली तसेच विभागाती अनेक नागरिक जबरदस्त प्रतिसाद देत विविध वस्तुंची खरेदी केली.

रिपोर्टर