श्रीमती प्रज्ञा मधु हळीकर यांची आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी निवड

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता  देण्यात येणारा " आदर्श शिक्षक महापौर " या पुरस्कारची अंतिम यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. पालिकेतर्फे निवड करण्यात आलेल्या अंतिम यादीत  श्रीमती प्रज्ञा मधु हळीकर  यांची आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारा साठी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. श्रीमती प्रज्ञा हळीकर या चेंबूर स्टेशन मुंबई महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक १, एम. वॉर्ड येथील शिक्षिका असून त्यांच्या निवडीमुळे विद्यार्थी वर्ग, सहकारी शिक्षक वर्ग,शाळेचे मुख्याध्यापक व मित्र  मंडळी आणि नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट