कर्जत तालुक्यांतील पोटल ग्रामपंचायतीवर महविकास आघाडीचा झेंडा; महाविकास आघाडीने केला जल्लोष!

पोटलचा थेट सरपंचपदी मिरा मसणे विजयी!

र्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील पोटल ग्रामपंचायतीचा निवडणुकीसाठी नुकताच मतदान प्रक्रिया पार पडली होती, त्याचा निकाल आज जाहीर झाला आहे, यामधे पोटल ग्रामपंचायतीचा थेट सरपंच निवडणुकीत महाविकास आघाडीचा सौ. मिरा सुनिल मसणे यांसह महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार भरघोस मताने निवडून आले आहेत, त्यामुळे महाविकास आघीडीचे नेते व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. 

राज्यातील सत्तातंरा नंतर कर्जत तालुक्यांत प्रथमच पार पडलेली पोटल ग्रामपंचायतीची निवडणूकीत शिंदे गट शिवसेनेने प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी येथे महाविकास आघीडीला कौल दिला आहे, त्यातच आगामी काळात माहाविकास आघाडी विरुद्ध शिंदेशाही आणि भाजपा यांच्यातील सामना कसा होणार याचे उत्तरही आजच्या निवडणुक निकालात दडल्याचे बोलले जात होते, त्याबाबतचा अंदाज आजच्या निकालाने राजकीय तज्ञांना आल्याचे सांगणेत आले आहे.

कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे हे शिंदे गटांसोबत “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षात गेल्यानंतर कर्जतमधे पोटल ग्रामपंचायतीची ही पहीलीच निवडणुक होती. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपला वरचष्मा असल्साचे सिद्ध केले आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांमधे बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा युतीसमोर आगामी निवडणुकांचे मोठे आवाहन महाविकास आघाडी समोर उभे ठाकणार आसल्याचे राजकीय तज्ञांना वाटते. 

विशेष म्हणेज आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी अशीच भक्कम राहिली तर शिंदे गटाला आपले उमेदवार येथे निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे, तर पोटल ग्रामपंचायतीचा आजच्या निकालाने “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाला कर्जतमधे मोठा झटका बसला असुन पुढील कालात निवडणुका जिंकण्यासाठी अधिक मेहनत “बाळासाहबांची शिवसेना” पक्षाला घ्यावी लागणार आसल्साचे बोलेल जाते. 

दरम्यान नुकताच पार पडलेल्या कर्जत तालुक्यांतील पोटल ग्रामपंचायतीचा निवडणुकीत धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढत होती, मात्र या लढतीत जनशक्तीचा विजय झाल्याचेही महाविकास आघीडीचे नेते सांगत आहेत. कर्जत तालुक्यांतील पोटल ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश महाविकास आधीडीला मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा कार्यकर्त्यांनी प्रंचड जल्लोष साजरा केला. 

कर्जत तालुक्यांतील पोटल ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला, त्यामधे महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडुन  पोटल ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला, त्यावेळी विजयी उमेदवारांचे स्वागत करताना महाविकास आघाडीचे नेते छायाचित्रांत दिसत आहेत, (छाया- धर्मानंद गायकवाड,

संबंधित पोस्ट