पोलीस स्टेशनसमोरच झोपले खडसे, १६ तासांपासून आंदोलन सुरूच

जळगाव: दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक झाले आहे. गेल्या १६ तासांपासून एकनाथ खडसे पोलीस स्टेशनला ठिया मांडल्यानंतर शहर पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर आंदोलन सुरू केले. रस्त्यावरच एकनाथ खडसे यांनी रात्री मुक्काम केला. न जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा एकनाथ खडसे यांनी पवित्रा घेतला आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत दूध संघात झालेला गैरव्यवहार हा गैर व्यवहार नसून तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी झाली असल्याचं म्हटलं आहे. मात्र १६ तास ठिय्या मांडूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने कायदा सुव्यवस्थेवरून विश्वास उडाला असून जोपर्यंत पोलिसांचे कपडे उतरवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा थेट इशारा एकनाथ खडसे यांनी आता पोलिसांना दिला.

खडसेंनी रात्रभर शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर  आंदोलन केलं. आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या आंदोलना ठिकाणी भेट देऊन यासंदर्भात सखोल माहिती जाणून घेणार आहे.

संबंधित पोस्ट