कर्जत वदप येथे बुद्धविहार उद्घाटन व बुद्धमुर्तीची प्रतिष्ठापणा!
वदप येथील संजय नगरात केली समाजबांधवांनी मोठी गर्दी!
- by Reporter
- Oct 10, 2022
- 575 views
भारतीय बौद्ध महासभा कर्जत शाखेचा स्तुत्य उपक्रम!
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- दि बुद्धीस्ट सोसायटी ॲाफ इंडीया (भारतीय बौध्द महासभा) तालुका शाखा कर्जत, जि. रायगड या धम्म संस्थेचा विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वर्षावास फिरती प्रवचन मालिका, आषाढ पौर्णिमा बुधवार दिनांक १३ जुलै २०२२ रोजी ते आषाढ पौर्णिमा रविवार दिनांक ९ ॲाक्टोबर २०२२ या कालावधीत कर्जत तालुका अध्यक्ष के. के. गाडे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यत आली.
दरम्यान या वर्षावास मालिकेची सांगता समारोप काल ९ ॲाक्टोबर रोजी कर्जत तालुक्यांतील वदप येथे करण्यात आला आहे, यावेळि वदप येथिल संजय नगर येथ बुद्धविहाराचे उद्धाटन करण्यात येवुन या बुद्धविहारात बुद्धमुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. येथील भारतीय बौद्ध महासभेचे विभाग क्रमांक ८ चे अध्यक्ष शरदजी रोकडे यांनी यांनी आकर्षक बुद्धमुर्तीची प्रतिष्ठापणा केली. यावेळी या कार्यक्रमास राज्य, जिल्हा तसेच तालुक्यांतील अनेक धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती,
रायगड जिल्ह्यातील वदप येथील संजय नगर मध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम दरवर्षी पार पडत असतात, त्यामुळे येथे कोणताही सामाजिक कार्यक्रम असेन तर समाज बांधवांची मोठी गर्दी उसळत असते,काल ९ रोजीही कर्जत तालुक्यांतील वदप येथे या वर्षावास सांगता कार्यक्रमास मोठा जनसमुदाय उसळला होता.
.यावेळि वदप येथे पार पडलेल्या या वर्षावास मालीका सांगता समारंभ व बुद्धविहार उद्घाटन, बुद्धमुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेचे कर्जत शाखेचे अध्यक्ष के. के. गाडे यांचा अध्यक्षतेखाली पार पडला आहे, तर या कार्यक्रमात पुज्यभन्ते महेंद्रबोधी यांनी आशिर्वाद दिले आहेत, या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव, केंद्रीय शिक्षक किसनजी रोकडे व बौध्दाचार्य शरदजी रोकडे, श्यामजी रोकडे यांनी केले.
.या कार्यकर्मास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन संस्थेचे ट्रस्टी व महासचिव व्ही. एस. मोखले, महाराष्ट्र अध्यक्ष महेद्रजी मोरे, कोषाध्यक्ष सदाशिव कवडे, रायगड जिल्हा अध्यक्ष काशिनाथ कांबळे, रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया (आठवले) चे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, रिपाइंचे कर्जत तालुका अध्यक्ष हीरामणदादा गायकवाड, साहीत्यिक लक्ष्मण अभंगे, हरीचंद्र सोनावणे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, नरेश गायकवाड, सचिन अनंता खंडागले, कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड, उपाध्यक्ष बबळु ढाले, दिपक गायकवाड, प्रकाश गायकवाड, भालचंद्र गायकवाड, नेरळ शहर अध्यक्ष दिनेश आढाव, जिवक गायकवाड, महीला संघटक सौ. वर्षाताई चिकणे, छगन रोकडे, संतोष जाधव यासंह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेकजण उपस्थितीत होते,
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी पार पडणेसाठी कर्जत भारतीय बौद्ध महासभेचा सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच वदप येथिल ग्रामस्थांनी मेहनत घेतली होती, तसेच या कार्यक्रमाच्या वदप संजय नगर येथे सर्व उपस्थितांना भोजन दान करणेत आले आहे, मोठ्या उत्साहात वदप येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास सांगता कार्यक्रम तसेच बुद्धविहार उद्धाटन व बुद्धमुर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळि संस्थेचे कर्जत तालुका अध्यक्ष के.के. गाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
रिपोर्टर