नवरात्री एक शक्ति - जागरण काल

अशाश्वत अशा सनातन वैदिक धर्मामध्ये गणेश उपासना, देवी उपासना, दत्तात्रेय उपासना, खंडोबा उपासना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपासना त्या त्या देवतेच्या उपासना कालात आपल्या भारत वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात त्या त्या रुळीपरंपरेनुसार उपासना (नवरात्रौत्सव) करण्यात येतात अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते विजयादशमी (दसरा) पर्यंत आपल्याकडे शारदीय नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो त्यालाच आपण घटस्थापना असे म्हणतो परंतू ही घटस्थापना करताना बांबू हा आयुर्वेदामध्ये आरोग्यकारक सांगितला आहे अशा या बांबूच्या परडीमध्ये पंचतत्वानी सिद्ध झालेला कलश (अग्नि,पृथ्वीतत्व,वायुतत्व,जलतत्व, आकाशतत्व) व त्यावर मूर्तिकेचे पूर्णपात्र ठेवून त्यावर देवीची स्थापना कलण्याची परंपरा आपल्या कडे आहे. त्यातूनच आपण नकळत उपास  उपवासना करुन शरीरातील पंचतत्व हे समसमान (balancing)  करण्याचा प्रयत्न आपल्या कडून नकळत होतो म्हणून पुराण आणि श्रृतीग्रंथ असे सांगतात (१)"कुल चंडी विनायकौ" (२)"कुलात उध्दरयति इति कुलदेवता" या कलियुगात विनायक (गणपति) चंडी (देवी)  या उत्तम फलदायी आहेत. कुलाचा उद्धार करणारी कुलदेवता ही फलदायी आहे. म्हणून "नवरात्री"काल हा सकाळ,दुपार, संध्याकाळ, रात्री कोणत्याही वेळी उपासना करुन देवते कडून स्वतःची शक्ती जागरण करण्याचा काल आहे असे आपण नक्की म्हणू शकतो "प्रथमं शैलपुत्रीच,द्वितियं ब्रम्ह चारिणी,तृतीयं चंद्रघंटेती, कुशमाण्डेति चतुर्थकम्,पंचमम् स्कंदमातेती, षष्ठं कात्यायणीतीच,सप्तममं कालरात्रीती, महागौरी तिचाष्टम,नववं सिद्धिदात्रीच नवदुर्गा प्रतिष्ठिता" थोडक्यात असे नवदुर्गाचे महत्व दुर्गा सप्तशती या ग्रंथात आपल्याला दिसून येते. 

प्रत्येक स्त्रिच्या जन्मापासून वृद्धपकाळापर्यंत वयानुसार व स्वभावानुसार मानसिक बदल व परिवर्तन म्हणजे सांकेतिक स्वरुपात मांडलेले वर्णन केलेले देवीदुर्गेचे नवतार  हे समजून घेतले पाहिजे दुर्गा सप्तशती, दुर्गा भागवत, दुर्गा कल्पदूम, अशा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये महत्व विषद केले.स्त्रिच्या व्यकतीमत्वातील शरीरधर्म मानसिक बुद्धीमत्ता या तीन पातळ्यावर विश्लेषण वैश्विक तत्वांशी तुलना करताना अधम्र्य स्पष्ट होते १)शैलपुत्री २)ब्रम्हचारिणी ३)चंद्रघंटा ४) कुष्माण्डा ५)स्कंदमाता ही पाच रुपे स्त्रीच्या शारिरिक वयानुसारअग्नितत्व,वायुतत्व,जलतत्व,पृथ्वीतत्व,आकाशतत्व,पंचमहाभूत रुपातील वैश्विक तत्वांशी करतानाचा स्त्रिच्या मानसिक वृत्तीचा संदर्भ देतात-

१) कात्यायनी २)कालरात्री ३)महागौरी ४) सिद्धीदात्री ही चार Dipesh मन, बुद्धी, चित्त, अहंकार स्त्रिंच्या गुणांचे वर्णन करतात.

१) ।।प्रथमं शैलपुत्रिच।।

शैलपुत्री (पर्वत कन्या) म्हणजे बालिका स्वरुप देवी पार्वती पर्वताची कन्या, मार्कण्डेय पुराणानुसार मेरु पर्वताची कन्या मैनावती आणि हिमालयचा राजा हिमावत याची पहिली कन्या गंगा व महादेवपत्नी पार्वती हिने शैलपुत्री म्हणजे पार्वतीच्या रुपात जन्मघेतला अशा उल्लेख दुर्गा सप्तशती ग्रंथात दिसून येते. देवी शैलपुत्री ही पर्वत रांगामध्ये गंगेसह नद्या,

पर्वत,भूमी,वृक्ष,औषधी या सर्व गोष्टीचे रुपक प्रतीक आहे. या शैलपुत्री देवीला "वृषारुढा" "उमा" या नावाने देखिल ओळखली जाते "शैलपुत्री देवी" ही पर्वत कन्या असल्याने पृथ्वीतत्वाचे आणि भूमिचे क्रियात्मक व सक्रीय प्रतिक मानले जाते. 

२) ।।द्वितीयं ब्रम्हचारिणी।।

ब्रम्हचारिणी देवी ही जलत्वाचे प्रतीक आहे.ब्रम्हचारिणी म्हणजे तरुण, व्रत पालन करणारी तप, त्याग,वैराग्य, सदाचार व संयम, या सात्विक गुणांची देवता म्हणजे ब्रम्हचारिणी धैर्य आत्मसंयम,इंद्रिय निग्रह,योगी,

तपस्वी ही ब्रम्हचारिणी देवीची वैशिष्ट्य आहेत.ही देवता जलतत्वाचे प्रतिक आहे जलयुक्त वीर्य हीम म्हणजे बर्फाच्या स्वरुपात असते त्यामुळे ते तिच्या ब्रम्हचारिणी स्वरुपात नसते.अशा प्रकारे ही देवता स्त्रिबीजांडाची जपणूक व वृद्धी करते म्हणून दुर्गेचे हे रुप जलतत्वाचे क्रियात्मक आणि सक्रिय प्रतिक मानले आहे (Frozan Seminal Fluid) चा वापर विज्ञानाने सिद्ध केला आहे.

३)।।तृतीयं चंद्रघंटेति।। 

चंद्रघंटा ही देवी अग्नितत्वाचे प्रतिक असून वाहन सिंह आहे चंद्रघंटा म्हणजे जिच्या हातात एक घंटा आहे ही घंटा म्हणजे बेल (समय)चे प्रतिक आहे. या नाद निर्मिती करणाऱ्या घंटेमुळे तिला वागेश्वरी या नामाने सुद्धा संबोधीत केले जाते (प्रथम शैलपुत्री पृथ्वीतत्व, द्वितीय ब्रम्हचारिणी जलतत्व,तृतीय चंद्रघंटा अग्नितत्व) अग्निस्वरुप प्रभावाला घंटा असे संबोधन कालवाचक आहे. म्हणून  चंद्रकलांच्या प्रभावाने २५/३२ दिवसांच्या अव्याहत चक्रात स्त्री ही रजस्वला होते आणि अग्नितत्वाचे प्रतिक बनते या संदर्भाने दुर्गेच्या किशोरावस्थेतील रुपाला "चंद्रघंटा" असे संबोधले जाते( घंटा संज्ञा - वेळ, समय) देवीच्या डोक्यावर अर्धचंद्र विराजमान आहे हे अग्नितत्व समसमान (Balancing) करण्यासाठी आहे. 

४) ।। कुष्मांडेति चतुर्थकम्।। 

कुष्मांडादेवी हे वायुतत्वाचे प्रतिक  असून  या सिंहवाहिनी आहे (कुष्मांडा या शब्दाचा अर्थ भोपळा प्रजातीतील भरपूर बिया असलेले फल) या देवीला "शाकंबरी" असेही संबोधले जाते म्हणून या देवीला "कुष्मांड" (भोपळाप्रजात) फळ देवीला अर्पण केले जाते.कुष्मांडा म्हणजे प्रवाहिबीज (अंड) की ज्यामुळे  फळाची बीजधारणा आणि पुनः निर्मीती होते बीज हे लघु आणि सूक्ष्म स्वरुपात असते.  आणि ते वायुतत्वामुळे प्रवाही होते व अन्य ठिकाणी स्थापन होऊन निसर्गात बीज धारणा आणि पुनःनिर्मीती होते.अशी बीजधारणा अव्याहत होत असते. वायुतत्वामुळे प्रवाही होणारे असे बीज निसर्गात पुन्हा निर्मिती करते म्हणून "कुष्मांडा देवी" वायुतत्वाचे प्रतीक आहे. 

५)  ।।पंचम स्कंदमाता।। 

 देवी स्कंदमाता आकाशतत्वाचे प्रतिक आहे.या देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमाता ही देवी आता विवाहित स्त्रीच्या मोहक रुपात आहे.ब्रम्हचारिणी रुपातील तिचा इंद्रियनिग्रह आता विरुद्ध भूमिकेत आहे. आधिच्या रुपातील अग्नि,पृथ्वी,वायु,जल तत्वांचा प्रभावी वापर करणारी देवी स्कंदमाता जगद्धात्री रुपात अगणीत - अपार - अदभुत आकाश तत्वाचे म्हणजेच ब्रम्हांडाचे प्रतीक आहे. 

६)।।षष्ठं कात्यायनी।।

कात्यायनी देवी हे "मानस" तत्वाचे प्रतीक आहे. या देवीचे वाहन सिंह आहे.कात्यायनी देवी ही तांत्रिक पंथ आणि सांप्रदायची अधिष्ठायी आहे या देवीला शक्ति आणि प्रकृती स्वरुप मानले जाते. विश्वनिर्मीतीला सहाय्यभूत बाहयतत्वे (external gross elements)म्हणजे पंचमहाभूते याला स्थूल अपारतत्वे असे म्हणता येईल. नवरुपाच्या मध्यभागी असलेले देवीचे पाचवे आकाश तत्वाचे रुप पहिल्या चार व नंतरच्या चार रुपांचे संतुलन राखणारे आहे. मानवी मन सर्वात वेगवान आहे. प्रेम, आशा, आकांक्षा,आनंद,द्वेश,निराशा,असुया,राग हे सर्व मानस (मनाचे) खेळ आहेत या सर्वांचे नियंत्रण करणारी देवी ही कात्यायनी स्वरुपात असते. 

७) ।। सप्तम कालरात्री।। 

कालरात्री देवी हे बुद्दीतत्वाचे प्रतीक आहे. या देवीचे वाहन गर्दभ आहे चतुर्भुज शरीर मुद्रेतील देवीचा वरचा उजवा हात अभय मुद्रेत आणि पुढचा उजवा हात वरद मुद्रेत आहे.देवी कालरात्रिच्या वरच्या उजव्या हाताची अभयमुद्रा बुद्धीतत्वाचे नियंत्रण करणारी देवता या वैशिष्टयाशी जोडली आहे.देवीच्या गर्दभ वाहनाचा रुपक संदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे गाढव हा प्राणी मेहनती आणि निरुपद्रवी आहे.योग्य निर्णय घेण्यासाठी अभ्यास करा, अनुभूति घ्या, मेहनत करा अशा आदर्श गर्दभ आपणास देत आहे.

८) ।।अष्टम महागौरी।। 

महागौरी देवी ही चित्त तत्वाचे प्रतीक आहे या देवीचे वाहन वृषभ असून शुभ्र वस्त्र व अलंकाराने नटली आहे. ही देवी अन्नपूर्णा नावाने सर्वश्रूत आहे.भगवान शिवाची पत्नी महागौरी कुटुंबाशी नाते जोडलेली, धर्मनिष्ठ,कल्याणकारी,परोपकारी वृत्तीची रक्षणकर्ता कुटुंब वत्सल यशस्वी स्त्री म्हणजे महागौरी होय. 

९)।।नवम् सिद्धीदात्री।। 

सिद्धीदात्री देवी ही अहंकाराचे प्रतीक असून सिंहवाहिनी आहे.सिद्धीदात्री देवी लक्ष्मी उपासकाला भौतिक सिद्धी देते.देवी सरस्वती अर्थात महाविद्या उपासकाला अध्यात्मज्ञानाची सिद्धी देते. अहंकार म्हणजे आपले स्वतःचे अस्तित्व अहंकार म्हणजे स्वतःची ओळख देवी सिद्धीदात्री आपल्याला आपले अस्तित्व आणि आपली ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शन करते अहंकाराचे आणि परिचयाचे रुपांतर गर्वात होऊ नये यासाठी जागरुक रहावयास सांगते.असे हे नवदुर्गा स्वरुप असून हे निश्चितच फलदायी आहे. 

या विषयी श्रुतीग्रंथात सांगतात

"ॐ यावज्जीवं नरः स्त्री व नवरात्रं महाव्रतम

कुरुते चण्डीकाप्रात्यै भुक्ती मुक्तीं च विन्दती"

शारदीय नवरात्री याला महाव्रत असे म्हणतात स्त्री पुरुष यांनी हे महाव्रत जीवनभर कुलदेवतेसाठी शक्ती उपासना साठी करावे त्यांने आपले शुभ संकल्प शिघ्र सिद्धिस जातात. 

          

            शुभं भवतू


लेखक

मोहन अनिल पुराणिक गुरुजी

वास्तु व ज्योतिष तज्ञ

मो नं 9022219731/9850837024

Email  - mohanpuranik55@gmail.com

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट