फायर ब्रॅण्ड युवा नेते मिलिंद कापडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश

सामाजिक बांधिलकी जपणारे व कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख

शालेय जीवनापासून कट्टर हिंदुत्ववादाचे बाळकडू पिलेले, कर्तबगार व एक वचनी असे युवा नेतृत्व अशी  जबरदस्त ओळख असणारे गोरेगाव  मधील  व्यक्तिमत्व म्हणजेच मिलिंद कापडे यांनी आपले समर्थन शिंदे गटाला देऊन त्यांच्या गटात त्यांच्याबरोबरच  प्रवेश केला. दैनिक आदर्श महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील विविध पैलूंबाबत  थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
 लहानपणापासूनच मेहनती, हुशार, अभ्यासू, आक्रमक आणि हजरजबाबी गुण ... हेच गुण पुढे शाळेत, महाविद्यायात व पुढील सामाजिक राजकीय जीवनात याची चुणूक त्यांनी आपापल्या विविध कार्य शैलीच्या माध्यमातून दाखवली. महाविद्यालयातील एन.सी.सी चीं शिस्त  म्हणजे शिस्तबद्धता आणि सराव. याचा प्रभाव पुढील सामाजिक व राजकीय कार्य करताना  कायम कामी आलेला आहे. BLC RD परेड, Best cadet of NCC, असे भूषणावह कामगिरी पार पाडत. लहानपासूनच देश, धर्म, न्याय यांची आवड असलेल्या मिलिंद (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) हा लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक होता म्हणून शिष्टाचार, अंगी बाळगून मिलिंद संघातील प्रथम,द्वितीय आणि तृतीयवर्ग शिक्षित स्वयंसेवक झाला. पुढे मिलिंदने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मध्ये कार्य केले. आंदोलने, मोर्चे, शिबिरे, कार्यक्रम आणि जनतेच्या हितासाठी २४X७ उपलब्ध राहणारा मिलिंद पुढे एक सच्चा कडवट हिंदुत्ववादी म्हणून बजरंग दल संयोजक पदापर्यंत पोहोचला. धर्मासाठी कट्टर हिंदुत्व अंगीकृत करून मिलिंदने बजरंग दल मुंबई,महाराष्ट्रात अनेक यशस्वी  आंदोलने करून आपली कर्तबगारी व नेतृत्व गुण दाखवून दिले. अनेक  हिंदुत्ववादी संघटना, तरुण मुले-मुली अत्यंत विश्वासाने  मिलिंद च्या जे कायम राहिली. त्याचा अफाट जनसंपर्कव आंदोलनाची  दखल प्रत्येक वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया  आणि राजकीय नेत्यांनी घेतली.
मिलिंद मधील सचोटीची, कर्तबगारी व नेतृत्व गुण  ओळखुन युवासेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे. यांनी मिलिंद चीं युवासेनेत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदावर नियुक्ती केली.काही वर्षातच मिलिंद ची पक्षासाठी ची तळमळ व कार्यतत्परता पाहून मिलिंद कापडे उर्फ मिलिंद  भाऊला ठाणे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी सध्याचे *विद्यमान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यात कार्य करण्याचीं संधी व त्यांचा सहवास लाभला. त्यानंतर सातारा, सांगली, नाशिक संपर्क प्रमुख म्हणून मोठ्या विश्वासाने आदित्यजी ठाकरेंनी भाऊला जबाबदारी दिली. ती मोठ्या हिकमतीने आणि तेवढ्याच विश्वासाने, मेहनतीने पार पाडली.आपल्या कलागुणाने, कर्तुत्वाने आणि स्वतःच्या हिमतीने मिलिंदने प्रत्येक कार्य मजल दर मजल करत पार केले.
युवासेनेचे कार्य प्रथमच महाराष्ट्राबाहेर घेऊन जाणारे मिलिंद भाऊ यांनी राजस्थान येथे मोहनलाल  सुखाडीया युनिव्हर्सिटी शिक्षण संस्थेत युवासेनेचा उमेदवार मोठ्या परिश्रमाने आणि स्वतःच्या बुदधीकौशल्याने निवडून आणला.तिथे आजही मिलिंद चा चाहता  वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गोरेगाव मधील खुज्या नेतृत्वामुळे मिलिंद काही काळ अडगळीत पडला, त्याच्या नेतृत्वा ला म्हणावा तसा न्याय मिळाला नव्हता. ही सल मिलिंद च्या मनात कायम होती.

 माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर उभा महाराष्ट्र ढवळून निघाला . स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करणारा कट्टर हिंदुत्ववादी युवा नेतृत्वाची कमान सांभाळणारा मिलिंद कापडे शिंदे गटात सामील झाले असून त्यांच्या सोबत  अनेक समर्थक व शिवसैनिक शिंदे गटात सामील होण्याच्या  मार्गावर आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट