जेयुएम संघटनेच्या मुंबईअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र साळसकर यांचा प्रभात पतपेढीतर्फे सत्कार

मुंबई : कालाचौकी कोप -ऑप. पतपेढीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे सर्वेसर्वा राजीव काळे  यांच्या मार्गदर्शना-नुसार तसेच प्रभातचे अध्यक्ष उमाकांत बारस्कर यांच्या अध्यक्षतेखाली काळाचौकी येथील अभ्युदय एज्युकेशन सभागृहात नुकतीच संपन्न झाली 

या सभेत प्रभात पतपेढीचे सभासद राजेंद्र साळसकर यांची जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र च्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रभात पतपेढी च्या वतीने जाहीर सत्कार करून साळसकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या सभेत राजेंद्र साळसकर यांच्यासह  प्रभात पतपेढी च्या अनेक सभासदांनी, करोना काळात ही पतपेढी एकही दिवस बंद न राहता या काळात अडचणीत आलेल्या सभासदांसह, सभासद नसलेल्या  रोजगार बुडालेल्या अनेक गोररगरीब व छोटे - छोटे व्यावसायिक यांना विना तारण कर्ज देवून मदतीचा हात दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळावर कौतुकाचा वर्षाव केला. 


संबंधित पोस्ट