महापालिका 'सी' विभागात बेकायदा बांधकामाचा महापूर

सुपारीबाज दुय्यम अभियंता सूरज पवार व कनिष्ठ अभियंता मंगेश कांबळीवर कारवाई कधी?

मुंबई:सुपारीबाज आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मुंबई महानगर पालिकेच्या अनेक विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. त्यातीलच एक महापालिकेचा 'सी' विभाग!  हद्दीत झवेरी बाजार येथील सराफावर ईडीने छापा मारून ९२ किलो सोने जप्त केले.

महापालिका 'सी' विभागात अनेक ठिकाणी जुन्या जीर्ण इमारती आहेत. ५५ तुलसी भवन लोहार चाळ, ८६ किका स्ट्रीट,१०१/१०३ काझी स्ट्रीट, २८१ करीम बिल्डीग, सी. एच स्ट्रीट धोबीतलाव ,१७६ विगास स्ट्रीट अशा अनेक इमारतींचा पुनर्विकासाच्या तर काही दुरस्तीच्या नावाखाली या इमारतींचे बांधकामे बेकायदेशीरपणे सुरु आहेत. राजु निर्भान विकासकांसारखे विकासक आणि सुपारीबाज महापालिका अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे हे बेकायदेशीर बांधकामे राजरोसपणे सुरु आहेत.  

सध्या देशातील अनेक राजकीय नेते किंवा काही कार्पोरेट कंपन्यांचा ईडी भ्रष्ट्राचार बाहेर काढत आहे. नुकतीच महापालिका 'सी' विभागातील हद्दीत झवेरी बाजार येथील सराफावर  ईडीने छापा मारून ९२ किलो सोने जप्त केले.  सराफा बाजारातील दुकानदारांवर ईडी छापा मारत आहे. ईडीने सराफांवर कारवाई केली याचे स्वागत करतानाच महापालिका 'सी' विभागातील अती भ्रष्ट सुपारीबाज दुय्यम अभियंता सूरज पवार कनिष्ठ अभियंता मंगेश कांबळी यांच्यावर ईडीने छापा टाकून मोठा भ्रष्ट्राचार बाहेर काढावा अशी मागणी रहिवाशी करीत आहेत.

संबंधित पोस्ट