
होल जिनोम सिक्वेन्सिंगमुळे ट्युबरक्युलॉसिसने होणारे मृत्यू टाळण्यात मदत शक्य
बीएमसीच्या आकडेवारीनुसार, मुंबईत २०२१ मध्ये सुमारे ६०,००० टीबी रुग्णांची नोंद झाली चढ्या मृत्यूदरामुळे रुग्णांना धोका
- by Reporter
- Sep 06, 2022
- 452 views
मुंबई,६ सप्टेंबर २०२२: महाराष्ट्रात टीबीच्या घातक आरोग्यविषयक, सामाजिक व आर्थिक परिणामांबद्दल सार्वजनिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणून, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे तसेच डॉ. वेळूमणी यांच्यासारख्या आरोग्य क्षेत्रातील दिग्गजांचे आणि जीई हेल्थकेअर आणि इंटेल इंडिया स्टार्टअप प्रोग्राम यांसारख्या खासगी कंपन्यांचे पाठबळ असलेल्या हेस्टॅक अॅनालिटिक्स (HaystackAnalytics) या मुंबईस्थित हेल्थ-टेक स्टार्टअपने एका चर्चासत्राचे आयोजन केले. भारतातील टीबीच्या साथीचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी यात आघाडीच्या फुप्फुसविकारतज्ज्ञांचा (पल्मनोलॉजिस्ट) सहभाग होता.
होल जिनोम सिक्वेन्सिंग (डब्ल्यूजीएस) हे भारतातील ट्युबरक्युलॉसिसच्या निदान व उपचारांसाठी क्रांतीकारी वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून कसे उदयाला येऊ शकते, याबद्दल जनतेला शिक्षित करण्याच्या दृढ उद्दिष्टाने सभेला संबोधित करताना, हेस्टॅकअॅनालिटिक्सने काही प्रख्यात पल्मनोलॉजिस्ट एका व्यासपीठावर आणले. यांच्यात टीबी असोसिएशन ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य महाराष्ट्रातील मुंबईत येथील राष्ट्रीय टीबी निर्मूलन कार्यक्रमाचे मास्टर राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. निखिल सारंगधर; नवी मुंबईतील तेरणा स्पेशॅलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील सहाय्यक प्राध्यापक तसेच नवी मुंबईतील आशीर्वाद हॉस्पिटलमधील कन्सल्टण्ट पल्मनोलॉजिस्ट डॉ. अंचित भटनागर; महाराष्ट्रातील मुंबईतील कन्सल्टण्ट चेस्ट फिजिशिअल व इंटेन्सिव्हिस्ट, डीएनबी (चेस्ट) डॉ. पंकज बंग यांच्यासह महाराष्ट्रातील मुंबई येथील हेस्टॅकअॅनालिटिक्सचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिर्वान चॅटर्जी यांचा समावेश होता. या मूकपणे मारणा-या आजाराचा परिणाम नियंत्रित करताना टीबीशी निगडित कलंकाची भावना, आव्हाने व संभाव्य उपाय यांच्यावर प्रकाश टाकणे हा चर्चेमागील हेतू होता.
भारतातील २०२२ सालातील टीबीविषयक अहवालानुसार (India TB report 2022), २०२० मध्ये १.३ लाख व्यक्तींची (यांना कोविडचीही लागण झाली होती) टीबीसाठी चाचणी झाली आणि त्यापैकी किमान २,१६३ व्यक्तींना आजार झाल्याचे निदान झाले. गेल्या दोन वर्षांत एकूण १४,४३८ जण टीबीमुळे मृत्युमुखी पडले आहेत. २०२१ मध्ये ७,४५३ जणांचा टीबीने मृत्यू झाला, हा आकडा २०२० मध्ये ६,९८५ होता.
टीबी रुग्णांमधील निदानाचे प्रमाण २०२० मध्ये सुमारे २८ टक्क्यांनी कमी झाले होते. केवळ ४३,४६४ जणांना हा आजार झाल्याचे निदान झाले. २०१९ मध्ये मुंबईत एकूण ६०,५९७ रुग्णांना टीबीचे निदान झाले होते.
या चर्चेदरम्यान, डॉ. निखिल सारंगधर यांनी कोविडनंतरच्या काळातील ट्युबरक्युलॉसिसची परिस्थिती उपस्थितांना सांगितली तसेच ट्युबरक्युलॉसिस निर्मूलनाच्या उद्दिष्टांबद्दलही माहिती दिली.
“२०१९ पासून मुंबईत १५-३६ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये टीबीच्या निदानात वाढ झाली आहे. मात्र, कोविड साथीमुळे लोकांमध्ये आरोग्यसेवा यंत्रणेकडे जाण्याची तयारी नव्हती. त्याचबरोबर श्वसनाशी संबंधित लक्षणांबाबत धास्ती घेतल्याने लोक लक्षणे दिसली तरी डॉक्टरांकडे जाणे टाळत होते. याशिवाय, टीबीच्या रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक सुरुवातीचे निदान व उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये जातात. त्यामुळे आर्थिक अडचणी, आरोग्यसेवा मनुष्यबळ कोविड उपचारांकडे वळवणे जाणे तसेच आरटी-पीसीआर रिपोर्ट अनिवार्य केल्यामुळे संसाधने उपलब्ध करून घेण्यात येणा-या अडचणी या सर्व कारणांमुळे रुग्णालयात जाण्यास विलंब झाला व परिणामी उपचार सुरू करण्यात विलंब झाला आणि याची परिणती मृत्यूंमध्ये झाली. तरीही महाराष्ट्रात टीबीचा सामना करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहे. सुमारे १००० भारतीय नागरिकांनी ट्युबरक्युलॉसिसच्या सुमारे ७००० रुग्णांची जबाबदारी नुकतीच स्वीकारली आहे. यात रुग्ण जलद गतीने बरे व्हावेत यासाठी व्यावसायिक, निदानविषयक व पोषणात्मक सहाय्याचा समावेश होतो. देशभरात अशी जबाबदारी स्वीकारणा-यांमध्ये महाराष्ट्रातील नागरिक आघाडीवर आहेत.”
डॉ. पंकज बंग पुढे म्हणाले, “अर्थात रुग्णांच्या स्थितीतील वैविध्य व बदल यांचा विचार करता, महापालिका, नागरी समाज, तरुण नागरिक, समुदायाधारित संस्था (सीबीओ) आणि समुदायातील सदस्य यांसारख्या अपारंपरिक संबंधितांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. हे सर्व घटक टीबीविरोधातील लढा जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दक्षता, निदान व उपचार तसेच महाराष्ट्रातील टीबीविषयक परिस्थितीवर देखरेख यांच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर विस्तृतपणे होत आहे. अशा प्रकारच्या एका निदानाचा अभ्यास आम्ही हेस्टॅकअॅनालिटिक्समध्ये करत आहोत. होल जिनोम टेस्टिंगद्वारे आपल्याला अधिक वेगाने निष्कर्ष काढता येऊ शकतात, यामुळे रुग्णांना लवकरात लवकर औषधांचे योग्य मिश्रण दिले जाऊ शकते. अखेरीस भारतातून टीबीचे निर्मूलन करण्याच्या उद्दिष्टासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणे निर्णायक महत्त्वाचे आहे.”
जिनोम सिक्वेन्सिंगसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानांची जोपासना करून, सरकारच्या व उद्योगक्षेत्राच्या पाठिंब्याने, आम्ही, २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात योगदान देऊ शकतो.
हेस्टॅकअॅनालिटिक्सचे सहसंस्थापक व सीईओ डॉ. अनिर्वान चॅटर्जी म्हणाले, “हेस्टॅकअॅनालिटिक्समध्ये आमचे उद्दिष्ट सध्याच्या निदान परिसंस्थेतील तफावती भरून काढणा-या व आव्हानांवर मात करणा-या नवोन्मेषकारी तंत्रज्ञानांचा शोध लावणे व त्यांचे उपयोजन शक्य करणे हे आहे. होल जिनोम सिक्वेन्सिंगमुळे टीबीचे निदान व डीएसटी प्रोफाइल्सबाबत अंदाज लावणे जलद गतीने होऊ शकते. यामुळे भविष्यकाळात निदानासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकतो व टीबीवर उपचार लवकर सुरू होऊ शकतात. मुंबईसारख्या लोकसंख्येची दाट घनता असलेल्या महानगरांमधील टीबीच्या रुग्णांची वाढती संख्या बघता, मल्टिड्रग-रेझिस्टण्ट टीबीचा दर चिंताजनकरित्या अधिक आहे. या आकडेवारीला दाट गर्दीच्या राहण्याच्या जागा अंशत: जबाबदार आहे. मात्र, आत्तापर्यंत अनेक स्थानिकांना टीबीचे अचूक निदान करण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी असलेल्या सुविधांचीच माहिती नव्हती. त्यामुळे टीबीच्या अधिकाधिक रुग्णांना उपचारांच्या कक्षेत आणणेच कठीण होते. टीबीचे आरोग्यावर, समाजावर व अर्थव्यवस्थेवर कसे विघातक परिणाम होऊ शकतात, याबद्दल अधिकाधिक लोकांना जागरूक करणे म्हणूनच खूप महत्त्वाचे आहे. याचे अगदी मूळ म्हणजे ट्युबरक्युलॉसिसची लक्षणे जाणवणारे लोक शोधणे आणि उपचारांच्या संपूर्ण प्रक्रियेत सहाय्य करणे, जेणेकरून उपचारांची सकारात्मक निष्पत्ती प्राप्त होऊ शकेल.”
हेस्टेकअॅनालिटिक्सच्या, ट्युबरक्युलॉसिस चाचणीवरील ओमेगा टीबी होल-जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये टीबी रुग्णांमधील औषधांना असलेल्या प्रतिरोधाची जलद गतीने ओळख पटवणा-या नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (एनजीएस) प्लॅटफॉर्मच्या उपयोजनाला, आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी, जून २०२२ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या बीआयआरएसीच्या बायोटेक स्टार्टअप एक्स्पो २०२२ मध्ये, एक नवोन्मेषकारी सोल्यूशन म्हणून मान्यता दिली आहे. ओमेगा टीबी चाचणीत उपस्थित टीबी प्रजाती तर ओळखल्या जातातच पण त्या पहिल्याच चाचणीत ओळखल्या जातात, त्यामुळे टीबीप्रतिरोधक औषध संवेदनशीलता चाचणी करण्याची गरज भासत नाही आणि निदानाचा अवधी काही आठवड्यांवरून केवळ सात ते दहा दिवसांवर येतो. त्यामुळे महत्त्वाचा वेळ वाचतो व पुराव्यावर आधारित उपचार प्रक्रिया लवकर सुरू करता येते तसेच टीबी कल्चर-बेस्ड चाचण्यांसाठीही हे पूरक ठरते. टीबी औषध प्रतिबंधाला जबाबदार अशी काही नवीन म्युटेशन्स ओळखण्यातही या चाचणीची मदत होते हा आणखी एक अतिरिक्त लाभ आहे.
रिपोर्टर