शिवसेना जिल्हाप्रमूख मनोहर भोईर यांचा ४० हजार मतांनी पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही:- आ. महेद्र थोरवे!
यापुढे जशास तसे उत्तर देवु;- मंत्री उदय सामंताचा ईशारा!
- by Reporter
- Aug 29, 2022
- 381 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- माझ्या शेपटीवर जो पाय ठेवतो, त्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो, असा ईशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नुकताच उरण मतदार संघाचे सेनेचे माजी आमदार तथा ठाकरे सेनेचे उत्तर रायगडचे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांना दिला आहे, मनोहरशेठ भोईर हे मागच्या विधानसभा निवडणुकीत ७ हजार मतांनी पराभूत झाले होते, मात्र आता सेना आणि भाजपा युती आहे, त्यामुळे पुढील निवडणुकीत मनोहर भोईर यांना ४० हजार मतांनी पाडल्याशिवाय महेंद्र थोरवे शांत बसणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञाही आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे. तर यापुढे जशास तसे उत्तर देवु, असा ईशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेतां दिला आहे, तसेच उद्योग करणाऱ्यांची मनमानी यापुढे चालणार नसल्याचा ईशाराही मंत्री सामंत यांनी दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदार संघात शिंदे गटाचा कर्जत खालापुरचा शिवसैनिकांचा जाहीर मेळावा काल २८ रोजी कर्जत येथिल शेळके सभाग्रुहात पार पडला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना कर्जतचे आमदार महेद्र थोरवे बोलत होते. यावेळि थोरवे यांनी मनोहरशेठ भोईर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या मेळावा प्रसंगी शिंदे गटाचा शिवेसना पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्या करणेत आल्या असुन काहींनी ठाकरेंचा शिवसेनेतुन शिंदे गटाचा शिवेसना पक्षात प्रवेश केला आहे.
मागील कालात राज्यात राजकीय बदल झाला, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करुन सेनेचे ४० आमदारांना सोबत घेवुन भातपा सोबत सत्ता स्थापन केली आहे, त्यामुळे एकच खळबळ माजली, कर्जतचे आमदार थोरवे हेही शिंदे गटात गेले आहेत, त्यानंतर आज प्रथमच कर्जत खालापुर मतदार संघात शिंदे गटाचा शिवसेनेचा कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा काल २८ रोजी पार पडला आहे. यावेळि या मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितीत लावली होती.
नुकताच पार पडलेल्या या मेळाव्यात शिवेसनेचे माजी तालुकाप्रमुख तथा उपजिल्हाप्रमुख भाई गायकर आणि महीला संघटक रेखाताई ठाकरे यांनी आज शिवसेनेचा शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे उदेयोगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले आहे.
या प्रसंगी व्यासपीठावर मंत्री उदय सामंत यांचा समवेत खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, महीला आघाडीचा रेखाताई ठाकरे, भाई गायकर, अमर मिसाल, उल्हास भुर्के, नेरळचा सरंपच उषाताई पारधी, माथेरानच चंद्रकांत चौधरी, पंकज पाटील, संतोष भोईर, विजय पाटील, संतोष विचारे, अंकुश दाभणे, प्रभाकर देशमुख व अन्य पदाधिकरी उपस्थितीत होते. या मेळाव्यामध्ये शिंदे शिवसेना गटाचे मंत्री उदय सामंत, खासदार अप्पा बारणे, भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
दरम्यान या मेळाव्यात कर्जतचे आमदार थोरवे यांनी ठाकरे शिवसेनेचे उरण मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्यावर घणाघात केला आहे, मनोहर भोईर यांनी राजकारण करणे आम्हाला शिकवू नये. असा टोलाही आमदार महेद्र थोरवे यांनी लगावला आहे,गेल्या वेळी मनोहरशेठ भोईर यांचा ७ हजार मतांनी पराभूत झाला होता, पण पुढीत कालात मनोहर भोईर यांना ४० हजार मतांनी पराभूत केल्याशिवाय आपण शांत राहणार नाही, असा निश्चयही आमदार थोरवे यांनी या मेळाव्यात बोलुन दाखविला आहे.
रिपोर्टर