
मुंबई पालिका कारभाराची चौकशी करताना!लोकसेवकांच्या विकासनिधीचीही चौकशी व्हावी-दिपक शिरवडकर
- by Reporter
- Aug 27, 2022
- 556 views
मुंबई : मा.आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची केलेली मागणी अभिनंदनीय आहे. ही चौकशी करत असताना मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सन २००० पासून खासदार-आमदार-नगरसेवक-अर्थसंकल्पिय तरतूद-डीपीडीसी फंड,आणि अन्य निधीतून केल्या गेलेल्या व जाणाऱ्या विकास कामांची,सदर कामे करणाऱ्या ठेकेदारांची,कामाच्या दर्जाची-हमी कालवधीची, कामाची वर्कऑर्डर काढणाऱ्या अधिकाऱ्यांची,कामावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंता-मुकादम यांची दर्जाहिन कामाबाबत केलेल्या कार्यवाहीची,केवळ तोडपानी करण्याकरता तक्रारी करणाऱ्या काही स्वयंघोषित समाजसेवकांकडून कामाच्या दर्जाबाबत केंद्रीय माहिती अधिकाराखाली करण्यात आलेल्या तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीची,अशी प्रकरणे कार्यालयीन स्तरावरून निकाली काढताना संबंधीत ठेकेदारांवर केलेल्या कारवाईची, काही ठिकाणी विकासनिधी खासगी संस्थांच्या बांधकामा ठिकाणी बेकायदा बांधकामा ठिकाणी वापरला गेला किंवा कसे?अशा कामांना प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली मंजुरी दिली,एखाद्या कामाचा हमी कालावधी असताना तो संपण्याआधी पुन्हा त्याच कामासाठी निधी वापरात आला असेल त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.तुरटी घोटाळा-ग्रीस घोटाळा हाउसगल्या दुरूस्ती घोटाळा, पेवरब्लॉक दर्जात घोटाळा याचबरोबर खासगी वाहन पुरवठा,एनक्रोचमेंट-अनुज्ञापन विभाग,जल-इमारत-कारखाने विभाग,घन-कचरा विभाग,मालमत्ता विभाग,बाजार विभाग आदी विभागाच्या कारभाराचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच तत्सम संस्था, कायदा विभाग, उद्यान विभाग, पालिका रुग्णालये दवाखाने आरोग्य विभाग,शाळा,स्मशानभुम्या रस्ते आदी विभागातील गैरकारभाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई-कार्यवाही व्हावी तरच अशा चौकशीचा फायदा?नागरी कामे करताना वापरण्यात येणाऱ्या साहित्यातही मोठा घोटाळा मिलीभगत करीत केला जातो.पालिका नियम-धोरण-अटी-शर्थी-मानक हमी कालावधी याचा साराच बोजवारा पालिकेच्या सर्वच प्रभागात हातमिळवणी करीत केला जातो हे कटु सत्य आहे. तसेच पालिका कर्मचाऱ्यांचा हजेरी घोटाळाही चर्चेचा विषय आहे.परिरक्षण विभागास नागरी कामे करण्याकरता पालिका प्रभागनिहाय लागणाऱ्या सर्व साहित्य पुरवठयातही मोठा घोटाळा होत असून कुंपणच शेत खात आहे,अशी परिस्थिती आहे.
रिपोर्टर