कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेसतर्फे मंगळागौर स्पर्धा संपन्न!
- by Reporter
- Aug 27, 2022
- 610 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड);- कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मंगळागौर 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला या मध्ये आठ संघाने भाग घेतला होता.
रायगड चे खासदार सुनील तटकरे यांच्या आशीर्वादाने, कर्जत खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शना खाली, माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून,रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उमा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मंगळागौर 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कर्जत नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड होत्या, यावेळी व्यासपीठावर राजिप माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी उपाध्यक्ष अशोक भोपतराव, कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर शेळके, उपाध्यक्ष उत्तम पलांडे, रा.जि. प.सदस्या रेखा दिसले, अस्सल चे सरपंच रमेश लदगे, दामतचे सरपंच जबिर नजे, शहराध्यक्ष पुष्पा दगडे, नगरसेविका भारती पालकर, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, माजी नगरसेविका अर्चना बैलमारे, उकरूळच्या सरपंच वंदना थोरवे, बीडच्या सरपंच प्रभावती लोभी, बोरिवली सरपंच वृषाली क्षीरसागर, नांदगावच्या सरपंच पल्लवी कारोटे, वदपच्या सरपंच नीरा विचारे, दामतच्या उपसरपंच नयना आखाडे, उकरुळच्या उपसरपंच निलिमा थोरवे, वदपच्या माजी उपसरपंच मनिषा पाटील, जिते सदस्या वंदना हजारे, बोरिवलीच्या सदस्या नेहा खडे, वदपच्या सदस्या कल्याणी पोटे, वंदना शिंदे, संगीता बडेकर,भारती घारे,निता पाटील, सुरेखा क्षिरसागर, मधुकर घारे, बंडू तुरडे, केशव मुने, संतोष थोरवे, राजन क्षीरसागर, भगवान पाटील, स्वरूप पाटील आदी उपस्थित होते.
कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस अध्यक्षा ॲड.रंजना धुळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले,या स्पर्धेमध्ये तालुक्यातील आठ संघाने भाग घेतला होता सदर स्पर्धेत भिसेगाव येथील जय अंबे माता महिला ग्रुपने प्रथम क्रमांकाची बाजी मारली. नेरळ येथील राजेंद्रगुरु नगर ग्रुप या महिला गटाने द्वितीय क्रमांकाची पटकावला तर उकरूळ येथील सरस्वती महिला ग्रुप या गटाने तृतीय क्रमांक मिळवला. राणी लक्ष्मीबाई महिला गट नालधेवाडी तसेच हिरकणी महिला ग्रुप वदप या दोन महिला गटांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.विद्या विकास शाळा नेरळ येथील माजी मुख्याध्यापिका आसावरी काळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले सोनम भोपतराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी आरवंद येथील रोहिणी नामदेव मोडक या विद्यार्थ्यांनीने वेटलिफटिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला म्हणून कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.
रिपोर्टर