विश्वासराव आरोटो यांचे टिटवाला दहीहंडी उत्सवामध्ये स्वागत!

टिटवाला : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस  विश्वासराव आरोटे यांना अमेरिका इंटरनॅशनल डॉक्टरेट पदवी नुकतीच दिल्ली येथे प्रदान करण्यात आली. विश्वाचा आरोटे हे राज्यभरातील स्थापित पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत गेल्या वीस वर्षापासून ते पत्रकारांना न्याय देण्यासाठी विविध स्तरावर आपला लढा लढत आहेत या लढ्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली.

दरम्यान सन २०२२ टिटवाळा दहीहंडी महोत्सव निमित्ताने टिटवाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना आमंत्रित करून त्यांच्या कार्याचा गौरव दहीहंडी महोत्सवात करण्यात आला. यावेळी टिटवाळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वार्ड क्रमांक १० चे अध्यक्ष अण्णासाहेब तरे ,नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, सचिव प्रवीण हांडे, दिलीप लांडे, राजू मीर पत्रकार सुनील गायकवाड ज्येष्ठ पत्रकार संजय वाघमारे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते

संबंधित पोस्ट