ओणी कोंडीवळे स्वामी गगनगिरी आश्रमांत भक्तीचा मळा फुलला!

राजापूर -  भगवान श्री परशुरामाच्या पावन भूमीत वसलेल्या रत्नागिरी जिल्यांतील राजापूर तालुक्यांत असलेल्या मुक्काम -कोंडीवळे (पोस्ट - ओणी) या स्थानी स्वामी गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. या आश्रमसंस्थेच्या वतीने व  चैतन्ययात्रा (डोंबिवली) परिवार यांचेतर्फे श्रावणमासाच्या पुण्यपावन पर्वामध्ये "स्वामी गगनगिरी याग व अन्नदान" हा धार्मिक सोहळा, हजारो भाविक-भक्तांचे चैतन्यदायी उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. 

यानिमित्ताने रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी ओणीआश्रमस्थानी स्वामी महाराजांची मूर्तीस अभिषेक- पूजा झाल्यानंतर सकाळी ९ नंतर यागास प्रारंभ झाला. सर्व विधी यथासांग पार पडल्यानंतर दुपारी २.३० वाजता महाआरती  होऊन सर्वांना  महाप्रसादाचे वाटप करण्यांत आले. 

या धार्मिक सोहळ्यास मुंबई-पुणे- कोल्हापूर- सातारा- कल्याण- डोंबिवली तसेच कोकणातून व राजापूरचे परिसरातील अनेक ग्रामस्थ व मान्यवर या स्थानी आवर्जून आले होते. त्याचप्रमाणे महाराजांचे विविध आश्रमाचे प्रमुख व इतर मठाचे मठाधिपती, व स्वामी गगनगिरी महाराजांची भक्तमंडळी यांनी संपूर्ण परिसर फुलून गेला  होता.

याप्रसंगी ओणी  आश्रमाचे प्रमुख श्री उल्हासगिरीजी महाराज यांनी सर्व उपस्थित महाराजांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे चैतन्ययात्रेचे सदस्यांचा यथोचित सन्मान केला.


 सदरहू धार्मिक सोहळा संपन्न होण्यासाठी ओणी आश्रमातील सर्व सेवेकरी वर्ग, ग्रामस्थ व चैतन्ययात्रा (डोंबिवली) परिवार यांनी बहुमोल सहकार्य केले. 

यावेळी श्री उल्हासगिरी महाराजांनी आपण मानव आहोत, देवाची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केले पाहिजे, स्वामी गगनगिरी महाराजांचे भक्तीत व सेवेत राहिले पाहिजे असे उपदेशपर  मार्गदर्शन केले. 

संबंधित पोस्ट