कर्जत मध्ये रात्रीच्या सुमारास घरावर पडले झाड! घराचे मोठे नुकसान, सुदैवाने जिवीत हानी टळली!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपरिषद हद्दीत येत असलेल्या डेक्कन जिमखाना कचेरी रोडलगत तुषार खवणेकर यांच्या घरावर काल बुधवार दि.10 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास झाड पडले, यामधे घराचे मोठे नुकसान झाले असुन नशिब बलवत्तर म्हणुन या घटनेत कोणतीही जीवीतहाणी झाली नाही. 

याबाबत अधिक माहीती अशी की, तुषार खवणेकर हे गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ कचेरी रोड जवळ श्रीराम मेढी चाळीत राहत आहेत. त्यांच्या घरा शेजारी सुमारे शंभर वर्ष जुने असेलेले आंब्याचे झाड मागील तीन चार दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री मुळापासुन तुटून घरावर पडले. त्यामुळे त्यांचा घराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

कर्जतमधील खवणेकर कुंटूब रात्री झोपण्याच्या तयारीत असताना अचानक रात्री अकराच्या सुमारास मोठा आवाज होऊन घरातील भिंत अर्धवट खाली आली, ही बाब मुलगी तनु व विधी यांच्या लक्षात येताच त्यांनी घरातील इतर सदस्यांना घरावर झाड पडल्याची कल्पना दिली. सर्व कुंटुंब क्षणात घराबाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला तसेच झाड घराच्या भिंतीच्या आधारावर थांबले. 

दरम्यान याबाबतची माहीती कर्जतचे तहसिलदार विक्रम देशमुख ह्यांना कळवतात त्यांनी तातडीने हालचाली करुन कर्जत नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक यांना सांगुन तेथे माणसे पाठवण्यास सांगितले. पण अद्याप नगपरिषेदच्या आपत्कालीन विभागाला झाड काढण्यास अपयश आले आहे. अजुनही त्याच स्थितित ते झाड आहे.‌ तसेच विज वितरण कंपनीचे अभियंता साबळे यांना कळवले असता त्यांनी तात्काळ कर्मचारी पाठवुन चालु असलेली विद्युत लाईन बंद केली आहे, या घटनेने संपुर्ण कर्जत शहर हादरले असुन हे झाड थेट खाली आले असते तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित पोस्ट