
रायगड जिल्ह्यातील तीन आमदार शिंदे गटात, तरीही मंत्रीमंडळात स्थान नाही, पालकमंत्री भाजपाचा होणार?
पुन्हा रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण होणेची चर्चा!
- by Reporter
- Aug 10, 2022
- 502 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत, अलिबाग आणि महाडचे तीनही आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत, असे असतानाच मंत्रिमंडळात रायगडला महत्वाचे स्थान मिळेन अशी चर्चा होती. मात्र काल झालेल्या शिंदे फडणवीस सरकारचा मंत्री मंडळाचा विस्तारात रायगडला संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर रायगडचे पालकमंत्री पुन्हा नामदार मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रुपात भाजपाचा होणेची चर्चा सध्या रायगडात सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे भाजपात प्रंचड उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान मागील कालात रायगड जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार असतानाही पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने या तीनही आमदारांमधे अंसतोष पाहावयास मिळाला आहे. त्यानंतर पालकमंत्री हटावं मोहीम या आमदारांनी हातात घेतली, आणि शिंदे गटा सोबत जाणे पंसत केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे महाविकास आघाडीचा माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री असतानाही शिवेसना पक्षात प्रंचड मोठी बंडखोरी झाली आहे, शिवेसनेचे तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सुमारे ४० आमदार शिवसेनेचे फोडून गट स्थापन केला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यानंतर शिंदे गटाने भाजपा सोबत युती करुन सत्ताही स्थापन केली, त्यानंतर शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले. त्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, मात्र या मंत्रीमंडळ विस्तारात रायगडचा पदरी पुन्हा निराशा आल्याचे राजकीय वर्तुलात बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील ३ आमदार सेनेचे आहेत, हे तीनही आमदारांनी शिवसेने सोबत बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले आहेत, तर सतत तीन वेळा रायगडातील महाड मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असणारे आमदार भरत गोगावले यांना शिंदे गटातुन मंत्रीपद मिळेन असा अंदाज अनेकांना होता, मात्र हा अंदाजही अखेर खोटा ठरला आहे. तर भाजपाचे आमदार प्रशांत ठाकुर यांनाही मंत्रीपद मिळेन अशी राजकीय दुनियेत चर्चा होती, ती चर्चाही खोटी ठरली आहे.
विशेष म्हणेज वादग्रस्त आमदारांचीही वर्णी शिंदे सरकारचा मंत्रीमंडळात लागली आहे, त्यातच एकाच जिल्ह्यात तीन तीन कॅबिनेट मंत्रीपदे दिली आसतानाच मात्र रायगड जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान पहील्या टप्प्यात स्थान मिळाले नाही, त्यामुळे रायगडचे राज्याचा राजकारणात अस्तित्व कमी होत चालले आहे का? कालचा मंत्रीमंडळ विस्तारने रायगड जिल्ह्याचा समावेश नसल्याला नक्की काय समजायचे? या संभ्रमात रायगडची जनता सापडली आहे.
दरम्यान फडणवीस सरकारचा कालात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले नामदार रविंद्र चव्हाण यांची वर्णी कॅबिनेट मंत्रीमंडळात लागल्याने रायगडचे पालकमंत्री पद पुन्हा एकदा नामदार रविद्रं चव्हाण याच्या रुपात भाजपाकडे जाणेची शक्यता राजकीय दुनियेतुन वर्तविली जात आहे, त्यामुळे महाविकास आघीडीसारखेच पुन्हा मित्र पक्षाकडे रायगडचे पालकमंत्री पद जात असेन तर महाविकास आघीडीवेळी मित्र पक्षाचा राष्ट्रवादीचे पालकमंत्री हटावं मोहीम हाती घेणाऱ्या सेनेचा या तीन आमदरांची पुढील भुमिका काय असेन? याकडे साऱ्यांचे लक्ष लागुन राहीले आहे. तर पालकमंत्री पद सेनेचा कोणत्या जिल्ह्यातील आमदारांना भेटतो का कसे? यावरही बरेच काही अवळंबुन असल्याची चर्चा राजकीय दुनियेत रंगात आली आहे.
रिपोर्टर