काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांना पोलिसांनी ठेवले नजरकैदेत

मुंबई : वाढती महागाई,अन्नधान्यावरील जीएसटी,बेरोजगारी, हुकूमशाही  आणि  अग्निपथ योजनेविरूद्ध आज राजभवनावर घेराव  घालून आंदोलन करण्यात येणार होते.  परंतु या  आंदोलनास उपस्तिथ  राहण्यापूर्वीच आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचे आणि  त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मधु अण्णा चव्हाण  यांना भायखळा येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात नजरकैद केली. त्यामुळे ते या  आंदोलनात पोहोचू शकले नाहीत. मोदी सरकार आल्यापासून आपल्या भारतात फार मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहेत. त्यातच हि हुकूमशाही एवढी आहे कि आम्हाला आज आंदोलनापासून देखील रोखण्यात आले त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो अशी माहिती काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी दिली. यावेळी त्यांच्या सोबत युवानेते समीर चव्हाण, ऍड उमेश साळवी आणि कार्यकर्ते उपस्तित होते.

संबंधित पोस्ट