अरबाजच्या गर्लफ्रेंडचे 'असे' होणार पदार्पण

'वेलकम टू बजरंगपुर'

मुंबई : सलमान खानचा भाऊ अरबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. जॉर्जियाचे पदार्पण दबंग ३ द्वारे होईल असे म्हटले जात होते, मात्र जॉर्जियाचे पदार्पण सलमानच्या चित्रपटाद्वारे होणार नसून, ते श्रेयस तळपदे याच्या चित्रपटाद्वारे होणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्जिया श्रेयस तळपदेसह 'वेलकम टू बजरंगपुर' या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. या चित्रपटात संज मिश्रा आणि शरद सक्सेना हे देखील दिसणार आहेत. तर, जिग्मांशु धुलिया देखील यात मदेशीर भूमिका साकारताना दिसणार आहे.

या बाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, जॉर्जिया परदेशातून गावात आलेल्या एका तरुणीची भूमिका साकारत आहे. गावातच तिची भेट श्रेयस तळपदे आणि इतर व्यक्तीरेखांशी होते.

हा चित्रपट सन २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या वेलकम टू सज्जनपुर या चित्रपटाचाच पुढील भाग आहे. पहिल्या चित्रपटात श्रेसयसोबत अमृता राव प्रमुख भूमिकेत होती.संबंधित पोस्ट