स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त काँग्रेसची ठाणे ग्रामीण जिल्ह्यात ७५ किलोमीटर पदयात्रा

भिवंडी : २०२२ हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असून ९ ऑगस्ट २०२२ पासून देशात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने स्वातंत्र्य लढ्यात योगदान असणाऱ्या काँग्रेस पक्षाने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ७५ किलोमीटर पदयात्रा काढण्याचा संकल्प केला असून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ७ ब्लॉक मध्ये ७५ किलोमीटर आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे.

ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण शहापूर,कल्याण ग्रामीण,बदलापूर शहर अंबरनाथ शहर,अंबरनाथ ग्रामीण व मुरबाड या ७ ब्लॉक मध्ये १० ते १५ किलोमीटर पदयात्रा काढली जाणार असून भिवंडी ग्रामीण मधील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथून पडयात्रेला प्रारंभ होणार असून काँग्रेस भवन मुरबाड येथे पदायात्रेचा जाहीर सभेने समारोप होणार आहे.यात्रेचा समारोप प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून पदयात्रेत प्रदेश पदाधिकारी सुभाष कानडे, माजी खासदार सुरेश टावरे,राजेश घोलप,कॅप्टन निलेश पेंढारी,हरीचंद्र थोरात हे उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्ष महेश धानके राकेश पाटील,प्रदीप पाटील,संजय जाधव,चेतनसिंह पवार,सोमनाथ मिरकुटे व त्यांचे सर्व सहकारी हे पडयात्रेचे नियोजन करत असून पदयात्रा यशस्वी करण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे असल्याचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले असून प्रत्येक ब्लॉक मधील जिल्हा तालुका,फ्रंटल,विभाग, व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दयानंद चोरघे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट