
सनराइज ऑन्कोलॉजी सेंटर बोरिवली पश्चिम येथे सर्वसमावेशक कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन करणार
- by Reporter
- Jul 29, 2022
- 369 views
मुंबई: डॉ. आशय कर्पे, डॉ. गिरिश कोर्दे, डॉ. भरत भोसले यांनी २०१७ मध्ये स्थापना केलेले सनराइज ऑन्कोलॉजी सेंटर २९ जुलै २०२२ रोजी बोरिवली पश्चिम येथे त्यांच्या नवीन सेंटरचे उद्घाटन करण्यास सज्ज
• हे सेंटर सर्वसमावेशक कॅन्सर केअर प्रदाता आहे, जेथे वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट्स एकाच छताखाली सर्वांगीण कॅन्सर केअर सुविधा देऊ शकतात, ज्यामध्ये मनोवैज्ञानिक समुपदेशन, वेदना व्यवस्थापन, अनुवांशिक समुपदेशन आणि पोषण व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन यांचा समावेश आहे
मुंबई, जुलै २०२२: डॉ. आशय कर्पे, डॉ. गिरिश कोर्दे, डॉ. भरत भोसले यांनी २०१७ मध्ये स्थापना केलेले सनराइज ऑन्कोलॉजी सेंटर २९ जुलै २०२२ रोजी बोरिवली पश्चिम येथे त्यांच्या नवीन सेंटरचे उद्घाटन करण्यास सज्ज आहे.
उद्घाटन करण्यात येणारे नवीन सेंटर सर्वसमावेशक कॅन्सर केअर प्रदाता आहे, जे केमोथेरपी, इम्यूनोथेरपी इत्यादी सारखे मुलभूत पद्धतशीर उपचार देण्यासोबत रूग्णांसाठी आवश्यक असलेले इतर सर्व पैलू व्यापून घेईल, जसे मनोवैज्ञानिक समुपदेशन, पोषण सल्ला, फिजियोथेरपी, अनुवांशिक समुपदेशन, वेदना व्यवस्थापन इत्यादी. टाटा हॉस्पिटल आणि भारतातील इतर सर्वोच्च संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेले वैद्यकीय ऑन्कोलॉजीमधील तज्ञ या सेंटरमध्ये उपचार प्रदान करतील.
नवीन केंद्र अत्याधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. सर्वोत्तम दर्जाचे उपचार दिले जातील याची खात्री करण्यासाठी नवीन केंद्र स्कॅल्प कूलिंग मशीन, लॅमिनार फ्लो मशीन यांसारख्या यंत्रणा देते आणि ऑन्कोलॉजी केंद्रित रुग्ण व्यवस्थापन सॉफ्टवेअर देखील वापरते.
या सर्वसमावेशक कॅन्सर केअर सुविधेच्या माध्यमातून भारतातील कॅन्सर उपचार प्रतिमानामधील विद्यमान पोकळी भरून काढण्याचा मनसुबा आहे, जसे नाविन्यपूर्ण उपचारांची उपलब्धता, मूल्य-आधारित केअरवर लक्ष केंद्रित करणारे उपचार वितरण आणि रुग्ण व केअरगिव्हर अनुभवाला प्राधान्य देणे. सर्वसमावेशक, सर्वांगीण आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित कर्करोगाच्या केअरसाठी प्रथम निवड बनण्याचा दृष्टीकोन आहे.
टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक पद्मश्री प्रा. (डॉ.) राजेंद्र बडवे (प्रमुख अतिथी) म्हणाले, “कर्करोगाच्या केअरसाठी सर्वसमावेशक व सर्वांगीण पद्धतीने दृष्टीकोन आखणे, तसेच रूग्णाच्या शारीरिक, भावनिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी हस्तक्षेपांची खात्री घेणे आवश्यक आहे. लवकर तपासणी महत्त्वाचे आहे आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा व उच्च अनुभवी ऑन्कोलॉजिस्ट्ससह सनराइज ऑन्कोलॉजी सेंटर अनेकांना उच्च दर्जाची, सर्वसमावेशक कॅन्सर केअर सुविधा देण्यामध्ये सक्षम बनेल.''
टाटा मेमोरियल सेंटरचे शैक्षणिक संचालक प्रा. (डॉ.) श्रीपाद बनावली (सन्माननीय अतिथी) म्हणाले, ''टीममध्ये कॅन्सर केअरच्या विभिन्न क्षेत्रांमधील उच्च शिक्षित व अनुभवी असलेल्या तज्ञ डॉक्टरांचे पॅनेल आहे. या बहुआयामी दृष्टीकोनासोबत सहानुभूती वृत्ती रूग्ण व केअरगिव्हर अनुभवाला प्राधान्य दिले जात असल्याची खात्री घेईल.''
रिपोर्टर