कर्जत पंचायत समितीचा १२ जागांसाठी आरक्षण सोडत!अनुसूचित जातीसाठी एकही जागा आरक्षित का नाही?
अनुसूचित जातीचा जनतेचा सवाल!
- by Reporter
- Jul 28, 2022
- 365 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील पंचायत समितीची मुदत संपली आहे, त्यामुळे कर्जत पंचायत समितीचा १२ जागांसाठी आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामधे अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३ आणि सर्वसाधारण साठी ६ जागा अशी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे, दरम्यान कर्जत पंचायत समितीचा १२ जांगापैकी एकही जागा अनुसूचित जाती साठी आरक्षित न पडल्याने कर्जत तालुक्यांत अनुसूचित जातीत मोडणाऱ्यांमधे निराशा पसरली आहे.
कर्जत तालुक्यांत पंचायत समितीची निवडणुक येवु घातली आहे. कर्जत पंचायत समिती स्थापनेपासुन अद्याप एकदाही कर्जत पंचायत समितीत अनुसूचित जाती साठी आरक्षित एकदाही आणि एकही प्रभाग आरक्षित पडल्याचे नोंद नसल्याचे सांगणेत येत आहे. कर्जत तालुक्यांत अनुसूचित जमातीची लोकसंख्याही अधिक आहे. असे असतानाही कर्जत पंचायत समितीचे मागील कालात १० चे १२ प्रभाग झाले, मात्र अनुसूचित जातीसाठी अद्याप येथे एकदा प्रभाग आरक्षित का पडत नाही? असा सवाल येथे बहुजन जनता उपस्थितीत करीत आहे. त्यामुळे कर्जत पंचायत समितीमध्ये अनुसूचित जातीचा आरक्षणाबाबत संबधितांनी सकारात्मक विचार करणेची मागणी होत आहे.
दरम्यान कर्जत पंचायत समिती प्रभाग पोशीर-सर्वसाधारण महीला, पाथरज- सर्वसाधारण, दहीवली तर्फे वरेडी- सर्वसाधारण, पंचायत समिती प्रभाग शेलु सर्वसाधारण महीला, सावेळे सर्वसाधारण आणि वेणगाव सर्वसाधारण हे ६ प्रभाग दोन महीला आणि ४ सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत. तर कळंब- अनुसूचित जमाती, कशेळे-अनुसूचित जमाती महीला आणि बीड बुद्रुक अनुसूचित जमाती महीला असे अनुसूचित जमातीसाठी महीलांसह ३ प्रभाग आरक्षित झाले आहेत, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गाासाठी नेरळ (महीला), उमरोली, पिपलोली(महीला) असे तीन प्रभाग आरक्षित पडले आहेत. मात्र अनुसूचित जाती साठी एकही प्रभाग आरक्षित पडला नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे कर्जत पंचायत समितीचा आरक्षण सोडती नंतर तालुक्यांतील अनुसूचित प्रभागात मोडणारे नाराज झाले आहेत, तर काही ठिकाणीचा आरक्षण सोडतीने “ थोडा खुशी थोडा गम” असे वातावरण असल्याचे सांगणेत येते.
रिपोर्टर