फलटणचे राजे राष्ट्रवादीतच राहणार, व्हॉटसअॅप स्टेटस ठेवत रामराजे यांचा कार्यकर्त्यांना सूचक संदेश

मुंबई :  विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर   लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप  प्रवेश करणार अशा ;  पद्धतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार सुरू आहेत. मात्र आज या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कारण रामराजे नाईक निंबाळकर यांना आपल्या व्हाट्सअॅप स्टेटस वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असणाऱ्या घड्याळ्याचा फोटो ठेवत 'कळेल ही आशा' असा  संदेश लिहिलेला आहे.

काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यातील करंजखोप या गावात आपल्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये आपल्या राजकीय वाटचालीची पुढील दिशा काय असावी याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. या चर्चेच्या माध्यमातून आगामी काळात सत्ताधारी पक्षाशी आपल्याला जुळवून घ्यायला हवं अशा पद्धतीचा देखील संदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांना दिली आहे.

या बैठकीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांना २९ तारखेला फलटण येथे आपल्या सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा एक मेळावा बोलावलेला आहे.  या मेळाव्यामध्ये आतापर्यंत ज्या काही चर्चा सुरू होत्या त्याबाबत कार्यकर्त्यांचा नेमकं काय म्हणणं आहे याबाबत ते बोलणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांना जे व्हाट्सअॅप स्टेटस ठेवला आहे. यावरून कुठेतरी रामराजे नाईक निंबाळकर यांना आपण राष्ट्रवादीतच आहे असा तर सूचक संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला नाही ना अशा पद्धतीची चर्चा रंगू लागली आहे.

रामराजे नाईक निंबाळकर हे   राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून शरद पवारांसोबत आहेत. २०१० साली रामराजे विधान परिषदेवर गेले, तेव्हापासून ते सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. 

संबंधित पोस्ट