कर्जत तालुक्यातील ६०० आदिवासी शेतकऱ्यांना २५ हजार ५०० फळ झाडांचे वाटप!

लाईट ऑफ लाइफ ट्रस्टच्या जागृती प्रकल्पाचा उपक्रम!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ६०० आदिवासी शेतकऱ्यांना २५ हजार ५०० फळ झाडांचे वाटप लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जागृती प्रकल्पाच्या माध्यमातून नुकताच करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून आदिवासी वाड्यावर जाऊन या फळझाडे वाटपाचे काम सुरु होते. आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनात वाढ होऊन त्यांना रोजगारचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून या आदिवासी शेतकऱ्यांना हि फळ झाडे वाटप करण्यात आली असल्याचे संस्थेचा वतीने सांगणेत आले आहे. 

कर्जत तालुक्यात गेल्या १७ वर्षा पासून लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट शिक्षण, आरोग्य, कृषी संवर्धन तसेच ग्रामीण भागातील महिला व बेरोजगार तरुणांना उपजीविका प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी विविध प्रकल्पाच्या माधमातून कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जागृती प्रकल्पाच्या माध्यमातून नुकताच सलग ४ दिवस २४ गावांतील ६०० शेतकऱ्यांना २५ हजार ५०० फळ झाडांचे त्यांच्या गावात जाऊन वाटप केले. 

या फळझाडांच्या वाटपाच्या मोहिमेमध्ये पोंड्याचीवाडी गावामध्ये ऑल कार्गो लॉजिस्टिक कंपनीचे सी.एस.आर. प्रमुख डॉ. निरतन शेंडे आणि व्यवस्थापक नितीन कांबळे हजर होते. तसेच लाईट ऑफ लाईट ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक गौतम कनोजे, कृषी अधिकारी कन्हैया सोमणे, तसेच कृषी सहाय्यक सुरज आगिवले, दशरथ नाईक हजर होते. या उपक्रमात ऑल कार्गो कंपनीचे २२ वरिष्ठ कर्मचारी पोंड्याचीवाडी गावात झाडे वाटप करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून आले होते. या २२ स्वयंसेवकांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन वृक्षारोपण केले. त्यानंतर या २२ स्वयंसेवकांनी तिवरे येथील लाईट ऑफ लाईट ट्रस्टच्या जागृती प्रकल्प, जीवन आशा कम्युनिटी सेंटरला भेट देऊन संपूर्ण प्रकल्प समजून घेतला.

दरम्यान कर्जत तालुक्यातील तीनघर ठाकूरवाडी, बुरुंजवाडी, दांडवाडी, नावंढेवाडी, नागीरेवाडी, बागवाडा, रजपे कातकरवाडी, पाचखडकवाडी, जामरूग बिडवाडी, वांगणेवाडी, जामरूग ठाकूरवाडी, वनेवाडी, आंबेवाडी, ताडवाडी, भिलवले ठाकूरवाडी, वावरले, नसरापूरवाडी, रामवाडी, पोंड्याचीवाडी, कामतवाडी, चिंचवाडी, कोशानेवाडी, भूतीवलीवाडी, कोल्हारवाडी या वाड्याचा समावेश होता.

संबंधित पोस्ट