स्वातंत्र्य दिनाच अमृत महोत्सव दिनी रॅपिड ॲक्शन फोर्स जावानांनी केली “हर घर तिरंगा” अभियानाची जनजागृती !

नेरळ जिजामाता तळाव व जुम्मापट्टी येथे वृक्षारोपन!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील जुम्मापट्टी येथे आज स्वातंत्र्य दिनाचा ७५ व्या अमृत महोत्सवा दिनानिमित्त केंद्र सरकारचा रॅपिड ॲक्शन फोर्सचा जवानांनी “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत परीसरात जनजागृती केली आहे. 

आज सकाळीच कोसी/ १०२ बटालियन दूत कार्यबलाचे सहाय्यक कंमांडर श्री. संजय कुमार चौव्हाण यांच्या नेत्रुत्वाखाली एक कमांडर टिम स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव दिनाअंतर्गत “हर घर तिरंगा” अभियाना बाबत जनजागृती करणेसाठी नेरळ येथे आली. यावेळी नेरळ ग्रामपंचायतीमधे या कंमांडर टिमने भेट दिली. नेरळचा सरंपच सौ. उषाताई पारधी, सदस्य धर्मानंद गायकवाड, सदस्या गितांजली देशमुख, सदस्या श्रद्धा कराळे, सामाजिक कार्यकर्ते केतन पोतदार यासंह नेरळ कर्मचारी यांच्या वतीने या टिमचे नेरळ ग्रामपंचायतीमधे स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथिल   ग्रामपंचायती जवळील जिजामाता तळावावर नेरळ ग्रामपंचायत प्रशासन आणि या जवानांनी वृक्षारोपन केले.

दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीमधील जुम्मापट्टी येथेही या जवानांनी जाऊन येथिल शाळेतील विद्यार्थी व परीसरातील नागरीकांना “तिरंगा” चे महत्व पटविले आहे, तसेच “तिरंगा”चे महत्व काय, तिरंगा चे पावित्र्य कसे जपावे, याबाबतही “हर घर तिरंगा”अभियानांतर्गत या जवानांनी जनजागृती केली. तसेच या परीसरातही स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवा निमित्त या जवानांनी वृक्षारोपन केले. यावेळी येथिल नागरींकांनी या जवानांच्य अभियानास उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. 


संबंधित पोस्ट