कर्जत रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सतीश श्रीखंडे!

शहरा बरोबरच ग्रामीण भागातील समस्या सोडवु;- श्रीखंडे

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- कर्जत रोटरी क्लबचा पद्ग्रहण समारंभ संपन्न झाला. यामध्ये नवीन पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सतीश श्रीखंडे तर सचिवपदी विशाल शहा यांची निवड करण्यात आली. तर खजिनदार पदाची जबाबदारी अरविंद जैन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

कर्जत मधील राज कॉटेजच्या सभागृहात रोटरी क्लबच्या पद्ग्रहण समारंभाचे नुकताच आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील अमित जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रांतपाल अविनाश कोळी, मावळते अध्यक्ष सुनिल सोनी, सचिव सचिन ओसवाल उपस्थित होते.

या प्रसंगी सुनिल सोनी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिन ओसवाल यांनी दृक्श्राव्य पद्धतीने वार्षिक अहवाल सादर केला. जितेंद्र ओसवाल आणि ठकेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे सतीश श्रीखंडे तर सचिवपदाची सूत्रे विशाल शहा यांच्याकडे सोपविण्यात आली. यावेळी बोलताना सतिष श्रीखंडे यांनी 'शहरा बरोबरच ग्रामीण भागातील समस्या समजून घेऊन. तेथील आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधांचा तसेच तेथील मूलभूत गरजांचा अभ्यास करून त्या सोडविण्याचा प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन करीन.' असा शब्द दिला. तर सुनील सोनी, 'प्रथम स्वतः व्यवस्थित व्हा मग दुसऱ्यांसाठी काम करा. हे पारमार्थिक काम आहे. नवीन माणसे जोडा, नवीन विचार जोडा सर्वांनी मिळून काम करा.' असा सल्ला दिला. 

तसेच या वेळी अमित जाधव यांनी 'घर सांभाळण फार अवघड गोष्ट आहे. काम होते ते कधी दिसत नाही. लहानपणी आपण मस्त बिनधास्त बोलायचो, वागायचो मात्र आता आपण जबाबदारीने वागले पाहिजे. दोस्ती मधून खूप चांगली कामे होतात. प्रत्येक जण समाजाला काही तरी देणं लागतो परंतु आपण देत नाही. आपण म्हणतो आपल्याकडे आल्यावर देऊ परंतु ती वेळ कधीच येत नाही. म्हणून वेळ आहे तेंव्हाच सत्कार्य करा. अशा किती गोष्टी आहेत त्या आपण घेऊन चालतो आहोत. सध्या करमणुकीची व्याख्या बदलली आहे. आपण वेळेची करमणूक करू लागलोय. हे बदलले पाहिजे.' असे स्पष्टपणे सांगितले. अविनाश कोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हुसेन जमाली यांनी केले.

दरम्यान याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, डॉ. मनोहर साबणे, डॉ. प्रेमचंद जैन, राहुल वैद्य, दीपक पाटील, दत्तात्रेय श्रीखंडे, प्रभाकर चव्हाण, योगेश राठी, दिपचंद जैन, प्रभाकर बडेकर, सूर्याजी ठाणगे, साईनाथ श्रीखंडे, ज्ञानेश्वर कडू, सुमित बैलमारे, स्नेहा श्रीखंडे, मुकुंद भागवत, समीर सोहनी आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट