राष्ट्रवादीच्या शिष्ट मंडळाने घेतली शिंदे-फडणवीस यांची भेट !
- by Reporter
- Jul 18, 2022
- 577 views
मुंबई : (मंगेश फदाले) महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज सोमवार दि. १८ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली.महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीने नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई व मदतीचे तातडीने वितरण करण्यात यावे ; आदी मागण्यांचे निवेदनही यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मा. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रिपोर्टर