कर्जतचे ॲड नवनीत साळवी यांची वकील क्षेत्रात उंच भरारी; ‘साळवी गायन पार्टीने’ केला डिकसळ गावाचा नावलौकीक!

सामाजिक कार्य सुरुच ठेवणार-ॲड. साळवी!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यीतील कर्जत तालुक्यांतील डिकसळ गावाची ओळख ज्या कुटुबांमुळे संपुर्ण राज्यात, आणि जिल्ह्तात झाली, त्याच साळवी कुटुंबातील नामांकीत वकील ॲड. नवनीत साळवी यांनी आज वकील क्षेत्रातही उंच भरारी घेतली आहे, ॲड. नवनीत साळवी यांचा संघर्षमय कहाणीने आज सारेच हेलावले आहेत. खोपोली येथे नवनीत साळवी यांचे घराचे ग्रुहप्रवेशावेळी ॲड.साळवी बोलत होते, दरम्यान आधी गायन क्षेत्रातुन डिकसळ गावाचे नावलौकीक केल्यानंतर आता विधीतज्ञ क्षेत्रातुनही डिकसळ गावाचे नाव ॲड. साळवी पुढे नेणार आहेत. 

कर्जत तालुक्यांतील डिकसळ गावात कित्येक दशके किसन साळवी आणि पार्टीने समाज प्रबोधन केले, त्यामुळे डिकसळ गावची ओळख संपुर्ण महाराष्ट्रभर या साळवी कुटुंबाचा माध्यामातुन झाल्याचे सर्वज्ञात आहे. भिवपुरी येथिल डिकसळ गावातील ही साळवी पार्टी असल्याने या गावाचे नाव साळवी कुटुंबानी कलेचा माध्यमातुन कानाकोपऱ्यात पोहोचविले आहे. तसेच व्यावसाय क्षेत्रातही या कुटुंबाने ठसा उमटविला आहे. आजही साळवी कुटुंबीयांची चौथी पीढीकडुन समाज प्रबोधनाचे काम अविरत सुरु आहे. 

मात्र याच साळवी कुटुंबातील उद्योजक कै. राहुल साळवी यांचे चिरंजीव ॲड. नवनीत सावळी हे सध्या वकील क्षेत्राचा माध्यमातुन समाजाची सेवा करीत आहेत, प्रंचड संघर्षांतुन नवनीत साळवींनी वकीली क्षेत्रात भरारी घेतली  आहे. एकाच वर्षात या साळवी कुटुंबातील लोकप्रिय गायक दिवंगत शुद्धोदन साळवी, दिवंगत विजय साळवी आणि दिवंगत उद्योजक राहुल साळवी यांचे निधण झाले आहे. त्यांचा निधणानंतर कुटुंबाची जबाबदारी ॲड नवनीत साळवी यांचावर येवुन ठेपली आहे, ते यशस्वीपणे कुटुबांची जबाबदारी पार पाडत आहेत.  असे असतानाच आज त्यांचा खोपोली येथिल ग्रुहप्रवेशात दोन चुलते आणि वडील येथे नसल्याची खंत ॲड. साळवी यांनी येथे बोलुन दाखविली आहे. मात्र त्यांचे सामाजिक काम आम्ही सर्व भाऊ पुढे नेवु असा विश्वास ॲड. नवनीत साळवी यांनी व्यक्त केला आहे.  

दरम्यान कर्जत तालुक्यांतील साळवी कुटुंबाने सातत्याने समाजाची सेवा केली आहे. अनेक ठिकाणी गायन क्षेत्रातुन अनेकदा मोफत समाज प्रबोधन केले आहे, तर डिकसळ गावाला या कुटुंबाने नावलौकिक मिळवुन दिला आहे. आज डिकसळ गावाचे कुठेही नाव काढले तर “साळवी पार्टीचे गाव” म्हणुन ओळखले जाते, आज या गावात प्रथम वकील झालेले या साळवी कुटुंबातील ॲड. नवनीत साळवी विधीतज्ञ झाले आहेत, त्यामुळे समाजाशी आपली बांधिलकी असुन ती आपण जपणार असल्याचे ॲड. नवनीत साळवी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आधी गायन कलेतुन आणि आता वकीली क्षेत्रातुन आपण सामाजिक काम सुरु ठेवणार असल्याचेही साळवी यांनी सांगितले आहे.

संबंधित पोस्ट