महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन राष्ट्रवादीचा पिडीतांना दिलासा
- by Reporter
- Jul 16, 2022
- 453 views
अहमदनगर (मंगेश फदाले) महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन तिथं झालेल्या शेती, पिकं व घरांच्या नुकसानीची पाहणी केली तसंच अधिकारी वर्गाकडून नुकसान व मदतकार्याचा आढावा घेतला.
विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घेतल्या.
अकोले तालुक्यातील माणिक ओझर या आदिवासी बहुल गावात घरं पडून झालेल्या नुकसानीची पाहणी करताना विरोधी पक्षनेते अजित पवार.
रिपोर्टर