कर्जत भाजपाचे तालुकाअध्यक्ष तथा नेरळचे उपसरपंच मंगेश म्हसकर यांना मातृशोक; परिसरात शोककळा!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जतचे भाजपाचे तालुका अध्यक्ष तथा नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेशदादा राजाराम म्हसकर यांचा मातोश्री सिंधूबाई राजाराम म्हसकर यांचे आज पहाटे ह्रदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्यामुळे त्यांचा कुटुंबात तसेच नेरळ शहरात शोककळा पसरली आहे.

नेरळ शहरातील पायरमाल येथे सिंधुताई म्हसकर या आपल्या कुटुंबासमवेत राहत होत्या. काल मध्यरात्री ३ वाजण्याचं सुमारास त्यांची प्रक्रुती बिघडली. त्यावेळेस सिधूताई म्हसकर यांना तिव्र ह्रदयविकाचा झटका आला, त्यात त्यांचे निधन झाले आहे.  श्री सदगुरु बैठकीसाठी पायरमाल येथिल म्हसकर कुटुंबाचे मोठे योगदान आहे. कै. सिंधूताई म्हसकर या श्री सद्गुरूंचा भक्त (श्रवण कार्तिक) होत्या. त्यांचा घरीच श्री सद्गुरूंचे बैठक भरली जात आहे. 

दरम्यान कै. सिंधूताई राजाराम म्हसकर यांच्या पश्चात मुलगा  मंगेश म्हसकर यांसह ३ मुले, मुलगी, सुना, नातवंडे, पुतणे, जावई असा मोठा परिवार आहे. कै. सिंधूताई म्हसकर यांच्यावर नेरळ येथिल स्मशानभुमीत अंत्य संस्कार करणेत आले आहेत, यावेळी या अंत्य संस्कार समयी कर्जत तालुक्यांतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहत्यीक, पत्रकारिता व इतर क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती.

संबंधित पोस्ट