
कर्जतचे ॲड. संदिप बागडे यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र "कला सन्मान" हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!
- by Reporter
- Jul 16, 2022
- 314 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील नेरळ शेलु येथिल ॲड. संदिप बागडे यांना "गीतकार-लेखक" या विभागात नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे, आर्ट बिटस् फौंडेशन पुणे यांचेकडून प्रौढ कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे ॲड. संदिप बागडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ यांनी दिलेल्या माहीतीनुसार एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात, त्यासाठी महाराष्ट्रातून अनेक कलाकार दरवर्षी आपली माहिती पाठवतात. त्यातून विशेष कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात येते. त्यामधे कर्जत तालुक्यांतील नामवंत वकील ॲड. संदिप बागडे यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आर्ट बिटस् ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला अशा सर्वच विभागातील कला कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आसल्याची माहीती या संस्थेचे संचालक संतोष पांचाल यांनी दिली.
दरम्यान संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांसाठी एक सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचली जाते. यासाठी सर्व स्तरातील कलाकारांनी या संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहनही आर्ट बिटस् फौंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार ॲड संदिप बागडे यांचा उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा कला सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
रिपोर्टर