तब्बल २४ वर्षानंतर एकत्रित येवुन विद्यार्थ्यांनी केला आंनदोत्सव साजरा! जुन्या आठवणींना दिला उजाळा!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील नेरळ विद्या मंदीर नेरळ शाळेतील १९९८ शैक्षणिक वर्षात ईयत्ता १० वी ब मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी नेरळ दहीवली येथिल एका रिसॅार्टवर एकत्रित येवुन “गेट दूगेदर” करुन आंनदोस्तव साजरा केला आहे, यावेळि २४ वर्षीपुर्वीचा जुन्या आठवणींना या सर्व विद्यार्थ्यांनी उजाळा दिला आहे, 

रायगड जिल्ह्यातील नेरळ येथिल नेरळ विद्या मंदीर शाळेतील १९९८ सालात ईसत्ता १० ब मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना  येथिल लहु काशिनाथ माने आणि दिनेश यशवंत गायकवाड यांनी एका व्हॅाटसाप ग्रुपवर एकत्रित आणले, त्यानंतर या ग्रुपवर तब्बल २४ वर्ष मागे जात या ईयत्तेतील सर्व विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते, या सर्व विद्यार्थ्यांनी आज सकाळी एकत्रित येत गेट टुगेदर केले आहे. यावेळी जुन्या आठवणीं काढत मोठा हाश्या करीत एकमेंकाना जुन्या सवयींची आठवण करुन दिली. 

दरम्यान यावेळी १९९८ सालात १० ब ईयत्तेत शिकणाऱ्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी येथे आपण दहावी ईयत्तेनंतर कसे आणि कोठे? आहोत याचा परिचय करुन दिला आहे. तब्बल २४ वर्षानंतर सुद्धा पुर्वी सारखेच हे सारे विद्यार्थी एकमेका सोबत वागत बोलत होते, या वेळी त्यावेळेस शिकवणाऱ्या शिक्षकांचे आपआपले अनुभव या विद्यार्थ्यांनी कथन केले, काहींनी तर आपण कसे शिक्षकांचा मार खात होते, कसे मधेच वर्गातून पळुन जात होतो, या आठवणी काढीत एकमेंकांना पुन्हा २४ वर्षांपूर्वीचा नावाने हक्काने आवाज देत पुन्हा जुन्या आठवणींना उजाला दिला आहे. आज तब्बल २४ वर्षांनी एकत्रित येवुन साजरा झालेल्या या गेट टुगेदराने सारेच आंनदीत झाले होते. पुन्हा २४ वर्षांनी एकत्रित आल्याने काहीजण भावनिक झाले होते.

संबंधित पोस्ट