नेरळ विकास आघाडीचा ग्रामपंचायत प्रशासनाची “वर्ष पूर्ती”!

नेरळ ग्रामपंचायतीने विकासात्मक योजना घेतल्या हाती!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी असणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीची सार्वकालिक निवडणुक २०१९ रोजी पार पडली होती, त्याचवेळी या निवडणुकीत थेट सरपंच पदी कै. रावजी शिंगवा हे निवडुण आले होते, मात्र त्यांचे दिर्घ आजाराने १४ जून २०२१ रोजी निधण झाल्याने नेरळ ग्रामंपचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमाती प्रवर्गा करीता रिक्त झाले, परीणामी येथे पुन्हा सदस्यांमधुन सरपंच पदाची निवडणुक घेणेत आली, त्यामधे अनुसूचित जमातीचा सौ. उषा क्रुष्णा पारधी या निवडुण आल्या, आणि आज बघतां बघतां १५ जुलै रोजी त्यांचा कार्यभाराची “वर्षे पूर्ती” झाली आहे.  

नेरळचे थेट सरंपच कै. रावजी शिगंवा यांचे निधणानंतर नेरळ विकास आघीडीचा सौ. उषाताई पारधी सरपंच! 

या बाबत अधिक माहीती अशी की, कर्जत तालुक्यांतील नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार मोठा आहे, या ग्रामपंचायतीचा सार्वत्रित निवडणुक सेना भाजपा आणि रिपाइं युतीने एकत्रित लढविली होती, त्यावेळी येथे सरपंच पद अनुसूचित जमाती साठी राखीव असल्याने येथे कै. रावजी शिंगवा हे थेट सरपंच म्हणुन निवडुण आले होते, त्यानंतर त्यांचे सरपंच पदावर असतानाच निधण झाले, त्यानंतर पुन्हा १५ जुलै २०२१ रोजी नेरळ ग्रामपंचायतीचा रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणुक घेणेत आली होती, मात्र या निवडणुकीत नेरळ सेना-भाजप- रिपाइं-शेकाप अशी चार पक्षांनी “नेरळ विकास आघाडी” तयार केली, यामधून अनुसूचित जमातीचा सौ. उषा क्रुष्णा पारधी यांना सरपंच पदी निवडुण आणले आहे.          

सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य अधिकाधिक वेळ देवुन नागरीकांचा समस्या सोडवित असल्याने होतोय विकास!

विशेष म्हणजे आज १५ जुलै रोजी नेरळ विकास आघाडीचा १ वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाला आहे या एक वर्षात नेरळ ग्रामपंचायतीचा अधिक विकास झाला आहे, येथे करोडो रूपयांची विकास कामे नेरळ विकास आघाडीने ग्रामपंचायती मार्फत केले आहे, नेरळ शहर “ स्वच्छ आणि सूंदर शहर” बनविणेसाठी येथिल सरपंच सौ. उषाताई पारधी, तसेच उपसरपंच मंगेश म्हसकर व सर्व सदस्य, सदस्या अधिकाधिक वेळ येथे देत आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतीचा विकास साधण्यास मदत होत आहे. 

नेरळ ग्रामपंचायतीवरील कर्जाचा डोंगर उतरविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष प्रयत्न!       

कर्जत तालुक्यांतील नेरळ ग्रामपंचायतीत नेरळ विकास आघाडीची सत्ता स्थापन होणेपुर्वी नेरळ ग्रामपंचायत कर्जाचा खायीत असल्याचे वातावरण होते, मात्र नेरळ विकास आघाडीने येथे सुसज्ज कारभार करीत नेरळ ग्रामपंचायतला कर्ज मुक्त करणेचे प्रयत्न केले आहेत, त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत विकसीत होत असुन नागरीकांना येथे मुळभुत अधिकाधिक मुळभुत सोयी प्राप्त होत आहेत, 

एमएसईबीचे लाखोंचे बील केले अदा करुन कर्मचाऱ्यांची थकीत पगारे केली रेग्युलर! 

नेरळ ग्रामपंचायतीत नेरळ विकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे सुमारे १ कोटीचे वीज बील थकीत होते, त्यापैकी सुमारे ७५ लाखाचा आसपास वीज बील नेरळ विकास आघाडीने सत्ता हाती घेतल्यानंतर अदा केले आहे, तसेच नेरख ग्रामपंचायतीचा कर्मचारी वर्गाचे अनेक महीन्याचे पगारही येथे मागील कालात थकले होते, ते पगारही नेरळ विकास आघाडीने चुकवून रेग्युलर केले आसल्याचे सरपंच सौ. उषा पारधी आणि उपसरपंच मंगेशदादा म्हसकर यांनी सांगितले आहे, तसेच नेरळ शहरातील अनेक समस्या नेरळ ग्रामपंचायतीचा वतीने सोडवण्याचे काम नेरळ विकास आघाडीचा माध्यमातुन सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी केले आहे. 


नेरळ ग्रामपंचायत प्रशासन घेणार अनेक विकासात्मक प्रकल्प हाती, स्वच्छ नेरळ, सुंदर नेरळ, कचरामुक्त नेरळचेच स्वप्न!

विशेष म्हणजे आणखीन दोन वर्ष कार्यकाल नेरळ ग्रामपंचायतीचा नेरळ विकास आघाडीचा हातात असल्याने पुढीत कालात नेरळ गावाची पाण्याची समस्या सोडविणेसाठी नेरळ शहरात भव्यदिव्य पाणी पुरवठा योजना राबविणे, नेरळ शहर कचरामुक्त करणेसाठी नेरळमधे घनकचरा प्रकल्प सुरु करणे, पिण्याचा अधिक पाणी साठा वाढविणेसाठी अधिक भाराचा पंप व ट्रान्सफार्मर बसविणे, वीजेची बचत करणेसाठी सौरऊर्जा प्रकल्प राबविणे, तसेच कचरा उचलणेसाठी वाहन संख्या वाढविणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीचा हीताचे विविध योजन राबविणे यासंह अनेक कामे पुढील कालात नेरळ ग्रामपंचायतीचा वतीने नेरळ विकास आघाडीचा माध्यमातुन हाती घेण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे, 

आघाडीचा दोन वर्षाचा कार्यकाल शिल्लक असल्साने नेरळचा चेहरामोहरा बदलणार, सर्व सदस्यांचे प्रयत्न! 

दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीचा विकास साधणेसाठी नेरळचा सरपंच सौ.उषाताई पारधी, उपसरपंच मंगेशदादा म्हसकर, सदस्य धर्मानंद गायकवाड, सदस्य शंकर घोडविदे, सदस्य राजन लोभी, सदस्य संतोष शिंगाडे, सदस्या गितांजली देशमुख, सदस्या श्रद्धा कराळे, सदस्या उमाताई खडे, सदस्या शिवाली पोतदार तसेच ईतरही नेरळ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हे नेरळ विकास आघीडीचा माध्यमातुन प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे १ वर्षात नेरळ ग्रामपंचायतीला कर्जाचा खायीतुन बाहेर काढणारे नेरळ ग्रामपंचायतीचा प्रशासनाकडून पुढील २ वर्षात अधिक विकास नेरळ ग्रामपंचायतीचा साधला जाणण्याचा विश्वास नेरळमधील नागरीकांना असल्याचेही सांगणेत आले आहे, येथिल कर्मचाऱ्यांची पगारे आता सुरलीत होत असल्याने कर्मचारी वर्गातही उत्साह असल्याचे दिसुन येत आहे, त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीच सध्या प्रगतीकडे वाटचाल करीत आसल्याचे बोळले जात आहे.





संबंधित पोस्ट