जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई अध्यक्षपदी राजेंद्र साळसकर

मुंबई,(प्रतिनिधी)-जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी राजेंद्र साळसकर यांची नियुक्ती करण्यात आली. युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री.नारायण पांचाळ, युनियनचे महाराष्ट्र सचिव हेमंत सामंत यांच्या उपस्थितीत साळसकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.   

जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हितासाठी निर्माण झालेली ट्रेड‌ युनियन असून ही इंडियन जर्नालिस्ट युनियनला संलग्न आहे‌.

वार्ताहर हा पत्रकारिता करीत असताना समाजाच्या विकासात भर घालणारे लिखाण करतो. विविध प्रश्नांवर आपल्या लेखणीद्वारे आवाज उठवितो. राज्यकर्ते व अधिकारी कर्मचारी यांचेवर लक्ष ठेऊन सरकारी काम व्यवस्थित चालले आहे की नाही पारदर्शकता आहे की नाही याची  माहिती नागरिकांपर्यंत देतो.प्रसंगी संबंधितांना जाब विचारतो यासाठी पत्रकारांना संविधानानुसार काही हक्क, जबाबदा-या,संरक्षण व नियम दिले आहेत.हे सर्व हक्क व फायदे  या सर्व पत्रकारांना मिळण्यासाठी कामगार कायद्यानुसार २००४ मध्ये जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र  ही संघटना स्थापन झाली असून,ही संघटना राष्ट्रीय पत्रकार संघटना आयजेयु,नवी  दिल्ली या संघटनेबरोबर 

संलग्न आहे,या संघटनेमार्फत वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच इतर वेब मिडियामध्ये काम करणा-या पत्रकारांना व इतर कर्मचा-यांना सरकारकडून सुविधा, मेडिक्‍लेम, सरकारी ओळखपत्र ,घरे,पेन्शन मिळावी. पत्रकारांवर होणा-या हल्ल्यापासून संरक्षण मिळावे. इत्यादींसाठी ‌ही युनियन काम करत आहे.मिडियामध्ये काम करणा-या पत्रकार, छायाचित्रकार कॅमेरामन ,लेखक,डिटीपी ऑपरेटर,व प्रुफ रीडर इत्यादि  या युनियनचे सभासद होऊ शकतात.पत्रकारांचे सर्व प्रश्न ख-या अर्थाने या युनियनच्या माध्यमातूनच सोडवले जाऊ शकतात.म्हणून सर्व सहकारी पत्रकारांनी एकजुटीसाठी एकत्र होऊन व युनियनचे सभासद होऊन आपला सहयोग द्यावा असे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी आवाहन केले आहे.राजेंद्र साळसकर यांनीही नारायण पांचाळ यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे सुतोवाच यावेळी केले.








.

संबंधित पोस्ट