कर्जत तालुक्यांत दमदार पाऊस; उल्हास नदीची पाणी पातळी वाढली; शेलु परीसरातील ३०० च्या वर कुटुंबे केले स्थलांतरीत!
प्रांत, तहसिलदार, पोलिस अधिकारी लक्ष ठेवुन!
- by Reporter
- Jul 13, 2022
- 382 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु असुन येथिल उल्हास नदीवरील दहीवली पुलावरुन पाणी वाहत आहे, त्यामुळे अनेक गांवाचा जगाशी संपर्क तुटला आहे, दरम्यान उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे कर्जत तालुक्यातील मौजे शेलू (के.बी.के नगर) येथील सुमारे ३०० च्या वर कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहीती अशी की, कर्जत तालुक्यांत गेल्या दोन दिवसापासुन सतत पावसाचा सरी कोसळत आहेत, आज तर सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाचा सरी कोसळत आहेत, त्यामुळे तालुक्यांतील नदी नाळे तुंडुब वाढत आहेत. कर्जत तालुक्यांतील अनेक नदीचा पुलावरुन पाणी वाहत आहे.
त्यामुळे ठिकाणी पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसिलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे व कर्जतचे पोलिस उपविभागीय अधिकारी श्री. लगारे, कर्जतचे पोलिस निरीक्षक श्री. कोल्हे, नेरळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, कर्जत आणि माथेरानच पोलिस निरीक्षक सौ. सुरेखा भणगे यासंह महसूल, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित आहेत.
दरम्यान कर्जत नगरपरिषद क्षेत्रात नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी यांनी नदीची पाहणी केली आहे, तीन चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हासनदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे, कर्जतचा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, नगरसेविका प्राची डेरवणकर, कर्जत नगर परिषद कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, नगर अभियंता मनिष गायकवाड, नगर रचना लक्ष्मण माने, अभियंता सारिका कुंभार, सुदाम म्हसे, सुनिल लाड यांनी बामचा मळा, मुद्रे आदी ठिकाणी जावून नदीच्या पाण्याच्या वाढलेल्या पातळीची पाहणी केली व त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षते संबधिचा सूचना दिल्या आहेत. नेरळ ग्रामपंचायतीचा सरपंच सौ. उषाताई पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर व अन्य सदस्य पूर परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत. प्रंचड पावसाचा सरी आज कोसळत असल्सान परिसरातील शाळा, कॅालेजस वेळेपुर्वीच सोडण्यात आले आहे.
रिपोर्टर