राजिप व पंचायत समिती निवडणुक लढविणारेंची कोंडी!उद्धवजी ठाकरे की शिंदे गटाकडुन लढायचे? भीष्म सवाल!
- by Reporter
- Jul 13, 2022
- 344 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- राजकारणात कोण कोणाचा कधी मित्र होईन, आणि कोण कोणाचा कधी शत्रू होईन याचा काही नेम नाही, त्यामुळे सध्या राज्यासह रायगडातही सेना विरुद्ध सेना असे वातावरण दिसुन येत आहे, तसेच राजिप व पंचायत समिती निवडणुकांचे तोंडावरच राज्यातील राजकारणात अनपेक्षित बदलहा झाला आहे, त्यामुळे निवडणुक उद्धवजी ठाकरे यांचा शिवसेनेतुन की शिंदे गटाचा शिवसेनेकडुन लढायची, असा भीष्म सवाल राजिप व पंचायत समितींचा निवडणुका लढविणाऱ्या सेनेचा पदाधिकाऱ्यांवर व ईच्छुक उमेदवारांसमोर उभा ठाकला आसल्याचे सांगणेत येते.
जिल्हा परीषद व पंचायत समितीचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढे गेला!
रायगड जिल्हा परीषद व पंचायत समिती सार्वत्रित निवडणुक २०२२ करिताचे आरक्षण सोडत मतदार यांदी तयार करणेचा कार्यक्रम जाहीर झाली होता, मात्र अतिव्रुष्टीमुळे होणारे नैसर्गिक पाश्वभुमीवर विभागीय आयुक्त कोकण, जिल्हाधिकारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हींगोली व अमरावती यांनी जिल्हा परीषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणुक २०२२ करीता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत विनंती शासनाला केली होती. त्यानुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित करणेचे नुकताच आदेश दिले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेत राहायचे की शिंदे गटात जायचे? सवाल!
सध्या शिवसेनेत झालेली बंडखोरीचा तोंडावरच ही निवडणुक पार पडणार असल्याने या निवडणुकीत कोणाशी कोणाचा युत्या कशा होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष सांगुन राहीले आहे. तर रायगड जिल्ह्यात सेनेत मोठी बंडखोरी झाली आहे, रायगडचे शिवसेनेचा तिकिटावर निवडुण आलेले महाडचे भरतशेठ गोगावले, कर्जतचे महेंद्रशेठ थोरवे आणि अलिबागचे महेंद्रशेठ दळवी हे तीनही आमदार शिवसेनेचा बंडखोर शिंदे गटात सामील आहेत, त्यामुळे रायगड जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीचे तोंडावर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमोर हिंदुह्रसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा शिवेसेनत राहायचे की शिंदे गटात जायचे? असा भीष्म सवाल निर्माण झाला आहे. तसेच काही पदाधिकाऱ्यांना काही ठिकाणचे आमदार व त्यांचे हस्तक संपर्क करुन सोबत राहणेचीही विनंती करीत असल्याचे काही पदाधिकारी सांगत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या तीनही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार!
विशेष म्हणजे रायगड जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला आहे, सर्वाधिक आमदार या जिल्ह्यात सेनेचे आहेत, असे असतानाच जिल्ह्यातील सेनेचे सर्वच्या सर्व म्हणजे तीनही आमदार बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने या तीनही आमदारांना आता आपली ताकद स्पष्ट करावी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजिप व पंचायत समिती निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडुन निवडणुकीसाठी उमेदवार देणेत येणेची शक्यता आहे, तर उद्धवजींचा शिवसेना पक्षाकडूनही या निवडणुकीत सर्व प्रभागात उमेदवार देणेत येणेचा सागंणेत येत आहे, त्यामुळे राजिप व पंचायत समिती निवडणुक लढविण्यास ईच्छुक असणारेंची चांगलीच गोची झाली आहे, तर काही जण उद्धवजींचा सेनेतुनच निवडणुक लढण्यावर ठाम आहेत, तर काही मात्र आमदांराचा निष्ठेपोटी बंडखोरीचा पावित्र्यात असल्याचे दिसत आहे,
शिवसेनेचा शिंदे गट कोणत्या पक्षात जर विलिन झाला तर काय करायचे? मोठी चिंता!
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटातील सेनेत गेलेल्या आमदारांसोबत जावु ईच्छित असणाऱ्यांना शिंदे गट कोण्या पक्षात विलीन झाला तर आपले काय होणार? या चिंतेत आहेत, काही मात्र आमदारांकडुन आपली कामे करुन घ्या, या तत्वावर शिवसनेशी बंडखोरी करणेस पुढे सरसावत आहेत, त्यामुळे आगामी राजिप व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी अनपेक्षित लढत काही ठिकाणी होणेचे संकेत आहेत, त्यामुळे सामान्य शिवसैनिक काय भुमिका या निवडणुकीत घेणार? याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहीले आहे,
रायगडात महाड, कर्जत आणि अलिबाग वगळता अन्य तालुक्यांत सेनेत फुट नाही!
रायगड जिल्ह्यातील महाड, कर्जत आणि अलिबाग मतदार संघातच शिवसेनेत मोठी फुट पडली असुन जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील शिवसैनिक मात्र ठामपणे उद्धवजींसोबत आसल्याचे पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडुन सांगणेत येत आहे, तर राजिप मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना सामिल असलेली महाविकास आघाडी एकत्रित येवुन निवडणुकीस सामोरे जाणेचे बोलेल जाते. तसे झालेच तर मात्र राजिप व अनेक पंचायत समित्यांवर शिवसेना-राष्ट्रवादी-कॅाग्रेस महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता येणेचा विश्वास राजकीय तज्ञ वर्तवित आहेत, त्यामुळे या निवडणुकीत अनेकांचे राजकीय अस्तित्वही धोक्यात येणेची शक्यता दिसुन येते,
महाविकास आघीडीचे आवाहन शिंदे गटाला पेलणार का? शेकापची भुमिका काय?
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षही मोठा पक्ष आहे, या पक्षाची कित्येक वर्ष राजिपवर सत्ता आहे, त्यामुळे या सत्तेचा बुरुज ढासलुन देणेस शेकापला परवडणार नसल्याचे राजकीय दुनियेत बोळले जात आहे, त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष राजिप निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत राहील असा अंदाज वर्तविला जात आहे, त्यामुळे राजिपचा निवडणुकी महाविकास आघीडीचा माध्यमातुन निवडणुक लढली गेली तर रायगड जिल्ह्यातील तीनही आमदार हे महाविकास आघाडीचे आवाहन कसे पेलतात? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडी निवडणुकांमधे न राहील्यास शिवसेनेचे दोन्ही गट संपणार?
राज्यात आणि रायगडात महाविकास आघाडी न राहिल्यास आगामी सर्वच निवडणुकीत सेनेत झालेल्या बंडखोरीने सेनेची प्रंचड वाताहत होवु शकते, सेना विरुद्ध सेना या लढाईंचा फायदा जिल्ह्यांत राष्ट्रवादी पक्ष आणि शेकाप पक्षाला होणार आहे, शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट हा जिल्हयात सर्वच
निवडणुकीत भाजपा सोबत राहणार असला तरीही भाजप जिल्हा परीषद निवडणुकीत सत्तेत या गटाला घेवुन जाणे मुष्कील असल्याचे राजकीय तज्ञांना वाटत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी कायम राहील्यास राजिपवर ही आघाडी सत्ता काबीज करु शकते असेही तज्ञ सांगत आहेत, असे असले तरीही महाविकास आघाडी राजिप व पंचायत समिती निवडणुकीत कायम न राहील्यास मात्र रायगडात सर्वाधिक फटका सेनेचा दोन्ही गटांना बसणार असुन रायगडात राष्ट्रवादी आणि शेकाप फोफावणार असुन शिवसेनेचा दोन्ही गटाचे राजकारण धोक्यात येवुन शिवसेना मात्र अस्ताचा दिशेने जाताना पाहावयास मिळणार आहे.
रिपोर्टर