आषाढी एकादशी निमित्त शारदा मंदिरचे विद्यार्थी छोटे वारकरी आनंददायी दिंडी घेवुन कर्जतचा विठ्ठल मंदिरात!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील शारदा मंदिर मराठी माध्यमाच्या विद्यार्थानी नुकताच आनंददायी दिंडी काढली आहे, दरवर्षी दिंडी घेऊन टाळ ,मृदुंग, ज्ञानोबा-तुकाराम असा गजर करत हातात झेंडे घेऊन हे छोटे वारकरी दिंडी घेऊन दहिवली येथील विठ्ठल मंदीरात जात असतात. कर्जत मधील नागरीकांनी या दिंडी चा आनंद घेतला.

कर्जत दहीवली विठ्ठल मंदिरात प्रवेश केल्यानंतर विद्यार्थानी विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेतले, त्यानंतर तेथे भजनाचा व अभंगाचा कार्यक्रम सादर केला. या वेळी मंदिराच्या सदस्यांनी मुलांना वह्या वाटप करून मुलांना प्रोत्साहन दिले. या प्रसंगी शाळेच्या मुखध्यपिका अंजली किसवे शिक्षक प्रफुल्ल देशमुख, श्रद्धा जामघरे, विजय सावंत. शरद उतेकर, निशा गाढे उपस्थित होते.





संबंधित पोस्ट