भेंडखळ येथे आषाढी एकादशी कार्यक्रम मोठया भक्ति भावाने साजरा

उरण (सुनील ठाकूर ).दिनांक १० जुलै २०२२ आषाढी एकादशी निमित्त... विठुचा गजर हरिनामाच झेंडा रोविला म्हणत पाऊले आपोआप चालती पंढरिच्या वाटे... पांडूरंगाच्या भक्तांना आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती पंढरिच्या वारिची आणि श्री विठु माऊलीच्या दर्शनाची आज संपुर्ण महाराष्ट्रातील माऊलीच्या भक्तांना पंढरी नगरी जशी नाळ मृदूंगाच्या आणि टाळ विणाच्या भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे तसेच मनमोहक दृष्य प्रतिपंढरपुर समजल्या जाणा-या भेंडखळ येथिल श्री विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये संपुर्ण उरण तालुक्यातुन आलेल्या भक्त व भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहावयास  मिळाले.

अगदी पहाटे पासुन शिस्तबध्द कार्यक्रमांचे आयोजन श्री विठोबादेव देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतिने आणि ग्राम पंचायत कार्यालय भेंडखळ तसेच ग्रामस्थ मंडळ भेंडखळ च्या वतिने आयोजित करण्यात आले होते.

पहाटे ४ वाजता : काकडा, ०५:३० वाजता : अभिषेक, ०६:०० वाजता आरती, सकाळी ०८:०० वाजता : प्रदक्षिणा दिंडी, सकाळी १० वाजता : श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, यांचे भजन, सायकाळी ०५:०० वाजताः श्री संत जनाबाई हरिपाठ मंडळाचे भजन, सायंकाळी ०७:०० वाजता ८ श्री ठाणकेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन, रात्री ०९:०० वाजता : न्यु ठाणकेश्वर मंडळाचा सुर संगिताचा कार्यक्रम, इत्यादी कार्यक्रमाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.

कोरोना काळात गेली २ वर्षे आषाढी एकादशी कार्यक्रमाचे आयोजन करता आले नसल्यामुळे हिरमुसले झालेले भक्तगण तसेच माऊली माऊली म्हणत डोईवर तुळसवृंदावन घेऊन हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झोलल्या माऊल्या आज शेकडोंच्या संखेन दिंडीमध्ये पहावयास मिळाल्या. छोटे छोटे बच्चे कंपनी विठूरायाच्या आणि रखुमाईच्या वेषात तर खुप सा-या भक्तांच्या नजरा आपल्याकडेच खिळवून ठेवत होतानाचे चित्र आज माऊलीच्या दिंडीत प्रत्यक्ष पहावयास मिळाले.

पहाटे पासुन ते रात्री पर्यंत सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री. विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष श्री. उध्दव नामदेव घरत तसेच उपाध्यक्ष श्री. देवानंद ठाकूर, श्री रमेश ठाकूर श्री. बळीराम भोईर श्री नरेश म्हाञे श्री. भारत ठाकूर श्री. अरूण म्हाजे, श्री. नासिकेत म्हाज, श्री नरेंद्र भगत, श्री. विजय भोईर, श्री. परशुराम भोईर, श्री. सुर्यकांत ठाकूर, श्री. किशोर ठाकूर, यांनी मोलाची कामगिरी पार पाडली विषेश सहकार्य श्री लक्ष्मण भास्कर ठाकूर यांचे होते तसेच मंदिर फुलांची आरास सजावट श्री गजानन तुलशिराम ठाकुर यांच्या मार्फत करण्यात आली होती.

संबंधित पोस्ट