माथेरान घाटात जवळ वडाचा मोठा वृक्ष कोसळला! सुदैवाने जीवीतहाणी टळली!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)-  रायगड जिल्हयातील माथेरान घाटातील रस्त्यावर काल शनिवार दि.९ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान सुमारे शंभर वर्षापूर्वीचा वडाचा वृक्ष कोसळला, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.  

या बाबत अधिक माहीती अशी की, जगप्रसिद्ध थंड हवेचा माथेरान मध्ये गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाटातील धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसत आहे, धबधब्याच्या आकर्षणामुळे माथेरान मध्ये पर्यटक येत असल्याने माथेरानच्या घाटात वाहतूक वाढली असून टॅफीक समस्याही निर्माण होत आहे. 

काल शनिवार आणि आज रविवार असल्याने माथेरान मध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, घाटात वाहतूक सुरू असतांना वङाचा मोठा वृक्ष मुळापासून उमळून रस्त्यावर पङला. काल संध्याकाळी साडेचार दरम्यान ही घटना घडली नेमकी त्यावेळेस कुठलेही वाहन येत-जात नसल्याने सुदैवाने कूठलीही जिवीत कींवा वित्तहानी झाली नाही, सदर वृक्ष त्या समोरील टपरी वजा हाॅटेल समोर पडला परंतु हाॅटेल चे कुठल्याही प्रकारचू नुकसान न झाल्याने हाॅटेल चालंकाने सुटकेचा निश्वास सोडला 

दरम्यान वृक्ष पडल्याचे समजाच समोरील गावातिल आदिवासी बांधव तसेच टॅक्सी चालक मदतीला धावून येऊन छोटासा रस्ता बनवून ऐकेरी वाहतूक चालू केली त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने वृक्ष बाजूला करून तब्बल दोन तासानी वाहतूक सुरळीत झाली.

संबंधित पोस्ट