इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी उत्तरा वैद्य यांची निवड!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- इनरव्हील क्लब ऑफ कर्जतच्या नवीन २०२२/२३ वर्षाकरीता पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला,क्लबच्या अध्यक्षपदी उत्तरा वैद्य यांची निवड करण्यात आली.

रॉयल गार्डनच्या सीबीसी सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट ईएसओ डॉ. शोभना पालेकर, पनवेल इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा संजीवनी मालवणकर, कर्जतचे सी. ए. विक्रम वैद्य उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, आरती भोसले यांच्या नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.माजी क्लबच्या कमिटीने मागील वर्षाची अहवाल सादर केला, त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून उत्तरा वैद्य, उपाध्यक्षा वनिता सोनी,सचिव मोनिका बडेकर,खजिनदार अवंतिका गायकर, एडिटर ज्योत्स्ना शिंदे, आय एस ओ प्राची चौडीए,सी सी शिल्पा दगडे, आय पी पी करुणा पराडकर यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्षा उत्तरा वैद्य यांनी नवीन वर्षाचे संकल्प सभासदांसमोर मांडले. डिस्ट्रिक्ट ईएसओ डॉ. शोभना पालेकर यांनी सर्वांनी मिळून ताकदीने कार्य करण्यावर भर द्या असे सांगितले. सी. ए. विक्रम वैद्य यांनी क्लब पाच वर्ष आदिवासी वाड्या-पाड्यात जावून त्यांच्या गरजा जाणून त्यांच्या साठी उपयुक्त उपक्रम राबवित आहे म्हणून क्लबसाठी माझ्याकडुन 1 लाख रूपयांची देणगी देत आहे असे सांगितले.या कार्यक्रमात संजीवनी घुमरे, उज्वला पाटील, आशा ठोंबरे,शितल पाटील यांनी नव्याने सदस्यत्व स्वीकारले आहे.

याप्रसंगी तन्वी जोशी, पल्लवी सावंत, सुलोचना गायकवाड,सरस्वती चौधरी, शिला गुप्ता, साक्षी अडसुळे, दिपा देशमुख, वैशाली दांडेकर, कश्यपी ठक्कर, भाग्यश्री शेळके, कीर्ती जोशी, सुप्रिया गिरी आदी उपस्थित होत्या.



संबंधित पोस्ट