चिर्ले येथील पुलावरून अवजड कंटेनर वाहतूक धोकादायक.

उरण (सुनील ठाकूर ) उरण तालुक्यातील चिर्ले  येथील सतत वाहनांची रहदारी असलेला पुल एका बाजूने तुटलेला असल्याने वाहतुकीस धोकादायक झाला आहे. पुलावरील रेलिंग तुटली आहे, आणि ती दुरुस्त करण्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे .पण ही जबाबदारी झटकून सार्वजनिक बांधकाम खाते या गोष्टीकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहे . या पुलावरून अवजड  अशी कंटेनर वाहतूक चालू असल्याने या पुलाला  मोठमोठे हादरे बसत आहेत. अशा या कमकुवत झालेल्या पुलावरून  खबरदारी म्हणून अवजड वाहतूक बंद केल्यास पुढे होणारी दुर्घटना  व जीवीत हानी टळू  शकते.

सदरच्या या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी तेथील नागरिक ,प्रवासी व वहानचालक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोंडी केली असता तिला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याला चपराक मिळावी म्हणून आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले आहे.

खरंतर प्रत्येक पुलावर साईड पट्ट्यांवर रेडियम असणे आवश्यक आहे तसेच धोकादायक सूचना फलक लावणे अत्यंत गरजेचे आहे .नाहीतर या गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असेल तर आज ना उद्या मोठी जीवित हानी झाल्या शिवाय राहणार नाही. सदरच्या पुलाची झालेली दुरावस्था येथील नागरिकांच्या,  प्रवाशांच्या जीवावर  कधीतरी बेतणार आहे  एवढ नक्की.अशी चर्चा नागरिकांत होत आहे. त्यावेळी या जीविताची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खाते घेणार का? असा प्रश्न तेथील नागरिक, प्रवासी व  वाहन चालक विचारत आहेत.

संबंधित पोस्ट