महिलांना कृषी विभागामार्फत अन्न प्रक्रीया उदयोगाची संधी

उरण (सुनील ठाकूर )ग्रामपंचायत कार्यालय मोठी जुई ता. उरण येथे नाबार्ड स्थापना दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित आर्थिक आणि डिजीटल साक्षरता अभियान मध्ये तालुका कृषि अधिकारी कार्यालय उरण मार्फत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न खादय प्रक्रिया योजना (PMFME) बाबत महीला बचत गटातील सदस्यांना माहीती देण्यात आली.             

PMFME योजनेत अन्न प्रक्रीया उदयोग सुरु करण्यासाठी शासनामार्फत 35% अनुदान मिळणार आहे. ही योजना बँक कर्जाशी निगडीत आहे. या योजनेचा मोठया प्रमाणात अन्न प्रक्रीया उदयोग, महीला बचत गट, तरुण व शेतकरी यांनी फायदा घेवुन योजनेत सहभाग घ्यावा. मोठया प्रमाणात होणारी अन्नाची नासाडी तसेच भात शेती परवडत नसल्याने वाढत्या उदयोगीकरणासोबतच सध्या अन्न प्रक्रीया उदयोगामध्ये मोठया संख्येने महीला बचत गट तसेच वैयक्तिक शेतकरी, तरुणांना वाव आहे. अशी माहीती श्रीमती शितल ढाकणे, कृषि सहायक, व श्रीमती कविता ठाकूर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी दिली. सदर प्रशिक्षणास सरपंच श्रीमती अश्विनी लहु भोईर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चिरनेर शाखेचे व्यवस्थापक श्री. मदन कोळी, व श्रीमती अस्मिता उंदिरे यांच्यासह मोठी जुई ग्रामपंचायत मधील महीला बचत गटातील सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट