माथेरान मध्ये संततधार पाऊस सुरुच! मागील वर्षाची सरासरीही ओलांडली!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- या वर्षी जून महिन्यात दङी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी करत मागील वर्षाची सरासरी जुलै महिन्यात ओलांडली आहे, माथेरान पर्यटन स्थळी संततधार पाऊस अद्यापही सुरुच आह, त्यामुळे आजपर्यंत माथेरान मध्ये १४१४ मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती माथेरान गिरीस्थान नगरपालिकेचे पर्जन्य मापक निरीक्षक अन्सार महापुळे यांनी दिली, हा पाऊस मागील वर्षांच्या तुलनेत जास्त आहे असेही ते म्हणाले आहेत, 

माथेरान मध्ये मुसळधार पाऊस पडत असतांना माथेरान आप्पती व्यवस्थापन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आप्पती व्यवस्थापनच्या टीमने भर पावसात फिरूण परिस्थितीचा आढावा घेतला त्यात माथेरान नगरपालिकेतच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, माथेरानचे अधिक्षक दिशांत देशपांङे, वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम, माथेरान पोलीस ठाण्याचे एपीआय शेखर लव्हे यांच्याह नगर पालिकेचे कर्मचारी वर्ग देखील होता. 

आपत्कालीन टीम ने संपूर्ण माथेरान चा आढावा घेऊन आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या तसेच एखादी दुघर्टना घङलीच तर आपत्कालीन कक्षाची संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी भणगे यांनी नागरिकांना केले यावेळी धोकादायक घरांची पहाणी केली. 

माथेरान मध्ये दसतुरीवर नाक्यावर तसेच रेल्वे स्थानकात काही जून्या वृक्ष पडल्याची माहित आपत्कालीन ग्रुप मध्ये येताच मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी तात्काळ दखल घेऊन वृक्ष बाजूला करून रस्ता वाहतूक मोकळ केला तर रेल्वे स्थानकात अडकलेली फांदी काढल्याने संभाव धोका टळला या वर्षी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्य़ातील सर्व अधिकारी वर्गाला आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांचे माथेरान मध्ये तंतोतंत पालन होताना दिसुन येते.

संबंधित पोस्ट