माथेरानचा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचा संकल्पनेतुन माथेरान मध्ये आपत्ती व्यवस्थापन ग्रुपची झाली स्थापना!
- by Reporter
- Jul 06, 2022
- 353 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- जग प्रसिद्ध असणाऱ्या माथेरान मध्ये मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या संकल्पनेतून माथेरान आपत्ती व्यवस्थापन ग्रुपची स्थापना केली असून या मध्ये माथेरान अधिक्षक दिशांत देशपांङे, माथेरानचे एपीआय शेखर लव्हे, वनविभागाचे आरेफो जंगम, नगरपालिकेचे कर्मचारी रेक्यू टीम चे सदस्य राजकीय पक्षांचे प्रमुख सामाजिक स्थरावर काम करणारे, तसेच पत्रकार व इतर विविध प्रकारे मदत करणा-या व्यक्तिचा यामध्ये समावेश आहे.
माथेरान हे ङोंगर माथ्यावर तसेच जंगलाने व्यापलेले पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्य वृष्टी दरवर्षी होत असते, येथे पावसाळ्यात किमान पाच ते सहा हजार मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद शासनदरबारी आहे, इथे अनेक झाङे जुनी झाल्याने पावसाळ्यामध्ये ती झाडे अनेकदा पडतात, तसेच जमिनीची धूप देखील येथे मोठ्या प्रमाणावर होत असते, त्यामुळे एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ आपत्ती व्यवस्थापनास त्यांची माहीती मिळावी तसेच मदत पोहचण्यास विलंब होऊ नये हा मुख्य उद्देश या ग्रुप स्थापनेचा असल्याचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान माथेरान मध्ये ३ जून २०२० साली निसर्ग चक्री वादळात घरावर झाङे पङून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये या करता माथेरान आपत्ती व्यवस्थापन ग्रुप महत्वाचा ठरू शकतो. तसेच काही जीर्ण झालेल्या झाडांच्या घरावर आलेल्या फांद्या तोडण्यास परवानगी दिल्यास घराचे नुकसान टळून आपत्ती व्यवस्थापनचा भार देखील कमी होऊ शकतो याचाही विचार झाल्यास या ग्रुप चा उद्देश सफल होईल, असे माथेरान शहरात बोलले जात आहे.
रिपोर्टर