पावसाचा प्रतिक्षेत असणाऱ्या कर्जतकरांना अखेर दिलासा! कर्जत तालुक्यांत मुसळधार पाऊस; सर्वत्रच आनंदी आंनद!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत जून संपला तरीही पावसाने आगमण झाले नव्हते, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता, अखेर दोन दिवसांपासुन कर्जत तालुक्यांतही मुसळधार पाऊल कोसळत असल्याने कर्जतकरांना दिलासा मिळाला आहे, 

या बाबत अधिक माहीती अशी की, दरवर्षी ७ जून नंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते, मात्र या वर्षी संपुर्ण जून महीना संपुण जुलै महीना चालु झाला तरीही उन्हाळ्यासारखे वातावरण होते, येथे शेतीची कोमेही पार पडत नव्हती, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता, तसेच काही वेळेस येथे किरकोळ पाऊस पडायचाही मात्र जमिनीची मशागत करणेसाठी हा पाऊस पुरक नव्हता. परीणामी शेतीची पेरणी प्रक्रिया अडकून पडली होती, त्यामुळे आता मुबलक पाऊस कर्जत तालुक्यांत पडल्याने आता शेतकऱ्यांची पेरणी प्रक्रिया पुर्ण होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

विशेष म्हणजे कर्जत तालुक्यांत दोन चार दिवसापासुन सुरू असणाऱ्या पावसाने आता धबधब् वाहु लागले आहेत, तसेच पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचाही कर्जतकडे ओघ सुरु झाला आहे, त्यामुळे पावसाळ्यातील हंगामी व्यवसाय तेजीत आसल्याचे दिसत आहे, तसेच कर्जत तालुक्यांतील काही फार्म हाऊस रिसॅार्टही आता पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले आहेत, त्यामुळे कर्जत तालुक्यांत पाऊस पडत असल्याने कर्जत तालुक्यांत आनंदाचे वातावरण आहे, 

दरम्यान आज सकाळपासूनच पावसाने ठोक उठवली आहे, प्रंचड धुवांधार पाऊस कर्जत तालुक्यात कोसळत आहे. या पावसाने पुर होणेची भिती वाटत असल्साने काहींनी तर घरातच बसणे पंसत केले आहे. रस्त्यांवर नागरीकांची वर्दलही कामी प्रमाणात दिसुन आली आहे, आणखी काही कांळ असाच पाऊस कोसळल्यास कर्जत तालुक्यांत पूर परिस्थिती येणेची शक्यता वर्तविली जात आहे, मात्र मुसळधार पडणाऱ्या या पावसाने आता नदी नाळे वाहू लागले असुन या पावसाने कर्जतकरांना, शेतकऱ्यांना तसेच पावसाळी व्यावसायीकांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

संबंधित पोस्ट